विश्वस्त मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक रविवारी पार पडली. त्यात सात जागा बिनविरोध झाल्या होत्या तर आठ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यात डॉ. प्रकाश बुरगुटे यांचा पराभव झाला होता. नूतन पदाधिकारी निवडीसाठी गुरुवारी नूतन संचालकांची बैठक झाली. त्यात या निवडी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भागवत चव्हाण यांनी सांगितले.
डॉ. बी. वाय. यादव, डॉ. गुलाबराव पाटील, तानाजी शिनगारे, राजेंद्र पवार, डॉ. विलास देशमुख, विष्णू पाटील, दिलीप रेवडकर, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, नंदकुमार जगदाळे, शशिकांत पवार, अरुण देबडवार, जयकुमार शितोळे, सोपान मोरे, दिलीप मोहिते हे संचालक म्हणून निवडून आले होते.
----
यावेळी जनरल सेक्रेटरी झालेले पी. टी. पाटील हे जलसंपदा खात्यातील सेवानिवृत्त उपअभियंता असून मामांचे गाव असलेल्या चारे येथील जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते संजय पाटील यांचे बंधू आहेत. त्यांचे वडील टी. एन. पाटील हे चाळीस वर्षे उपाध्यक्ष होते. पहिल्यांदाच चारे गावाला मामांच्या नंतर हे पद मिळाले आहे.
संस्थाध्यक्षपद मानाचे
जगदाळे मामांंची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद बार्शी शहर व तालुक्यात मानाचे पद म्हणून ओळखले जाते. जनमानसातदेखील या पदाकडे आदराने पाहिले जाते. डॉ. बी. वाय. यादव हे अपवाद वगळता १९८६ पासून अध्यक्षपदाची धुरा संभाळत आहेत.
----
सोबत फोटो
010721\img-20210701-wa0009.jpg
शिवाजी शिक्षण मंडळाच्या मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ बी वाय यादव ,जनरल सेक्रेटरी पदी पी टी पाटील
उपाध्यक्षपदी नंदन जगदाळे तर खजिनदारपदी जयकुमार शितोळे