सोलापूर : तिरुपती वेंकटेश्वर पत्नी महालक्ष्मी स्वरूपिणी देवी पद्मावती अम्मावारु या स्वतः 'मी पद्मशाली' असा गर्भगृहातून आवाज देऊन पुरातन काळापासून साडी चोळी, ओटीभरणाचा पद्मशाली वंशीयांचा बहुमान कायम ठेवला तशी नोंद ताम्रपटात असून तो ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानाकडे उपलब्ध आहे.
महालक्ष्मी स्वरुपिणी पद्मावती देवीस साडी चोळी ओटीभरणाचा मान ब्रह्मोत्सवामध्ये सोलापूर पद्मशाली समाजबांधवांना मिळावा यासाठी सोलापूर पद्माशाली ज्ञाती संस्थेच्या सहकार्याने पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सव संस्था स्थापन करण्यात आली. ही संस्था शासन नोंदीत आहे. या संस्थेच्या वतीने सोलापुरातील पद्मशाली बांधवांना साडी चोळी, ओटीभरणसाठीचे सौभाग्य मिळावे यासाठी पद्मावती देवी देवस्थानकडे सतत पाठपुरावा करण्यात आला त्यास देवीकृपेने यश मिळून देवीच्या ब्रह्मोत्सवामध्ये ६ डिसेंबर २०२१ हा दिवस प्राप्त झाला होता. त्या दिवशी सोलापुरातील बहुसंख्य जोडप्यांनी तिरुचूनूर येथे पद्मावती देवीस साडी चोळी, ओटीभरणाचे सौभाग्य प्राप्त केले.
यंदाच्याही वर्षी पद्मावती देवी देवस्थानम् ने २२ नोव्हेंबर २०२२ हा शुभदिवस देवीकृपा आशिर्वादाने सोलापुरातील पद्मशाली समाजबांधवांसाठी सुनिश्चित केलेले आहे, तरी जास्तीत जास्त समाजबांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष जनार्दन कारमपुरी आणि गणेश पेनगोंडा यांनी केलं. या पत्रकार परिषदेस अंबादास बिंगी, अजय पोन्नम, श्रीधर सुरा, दामोदर पासकंटी, दत्तू पोसा, पुरुषोत्तम सग्गम आदी उपस्थित होते