शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

बार्शीत शालेय पोषण आहारात अपहार; मुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:33 AM

बार्शी : शालेय पोषण आहार शाळेत न शिजवता अन्यत्र तयार करून दिला. त्याबद्दल खोटी कागदपत्रे तयार करून १.९७ लाखांचा अपहार केल्याबद्दल मुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. राज्य शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार शाळेतच शिजवून दिला जावा, असे बंधन असताना याची अंमलबजावणी केली नाही. ...

ठळक मुद्देखोटी कागदपत्रे तयार करून १.९७ लाखांचा अपहारमुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा

बार्शी : शालेय पोषण आहार शाळेत न शिजवता अन्यत्र तयार करून दिला. त्याबद्दल खोटी कागदपत्रे तयार करून १.९७ लाखांचा अपहार केल्याबद्दल मुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. 

राज्य शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार शाळेतच शिजवून दिला जावा, असे बंधन असताना याची अंमलबजावणी केली नाही. यासंबंधी गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र भारुड यांच्या आदेशावरून सुलाखे हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा शालेय समितीचे सचिव ए. जी. पाटकूलकर, समिती सदस्य आनंद सुलाखे, ह. वि. कुंभार, कि. रो. भानावत, अ. गो. कवठाळे (सर्व रा. बार्शी) यांच्या विरोधात तक्रार अर्ज देताच पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदला आहे.  

 त्या तक्रारीवरून व दिलेल्या आदेशावरून गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी तपासणी केली. त्यानंतर त्यात पाचवीचे २०० तर आठवीचे ८०० असे एक हजार लाभार्थी दाखवून बोगस रेकॉर्ड केल्याचे दिसून आल्याने त्यात १ लाख ९७ हजार ६१३ रुपयांचे ४७९५ किलोग्रॅम तांदळाचा अपहार करण्याच्या उद्देशाने रेकॉर्ड केल्याचे दिसून आले. दिलेल्या तक्रारीत ज्या आरूषी महिला बचत गटास शिजविण्याचे काम दिले आहे, त्यांना रोज मुख्याध्यापक जेवढा तांदूळ देत होते तेवढा ते शिजवून देत होते, असे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आहार शाळेतच तयार करणे बंधनकारकपोलिसांच्या माहितीनुसार शालेय पोषण आहार पहिली ते पाचवीच्या मुलांना प्रत्येक शाळेत दररोज १०० ग्रॅम तर सहावी ते आठवीच्या मुलांना १५० ग्रॅम तांदूळ शिजवून द्यावा. त्यात विविध भाज्या घालून मेनू तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी हा आहार सुरू केला. विशेष म्हणजे तो शाळेतच तयार करणे बंधनकारक आहे. परंतु याचा अंमल व्यवस्थित केला नाही. तो बाहेरून आणून मुलांना वाटप केला. शिवाय शासनाने ठरविलेल्या प्रमाणापेक्षा कमी शिजवला. रेकॉर्डवर जास्त बोगस पटसंख्या दाखवली. त्याचा अपहार होत असताना त्याबाबत शालेय समितीकडे तक्रार देऊनही दखल घेतली नाही. याबाबत शिक्षण मंडळाचे माजी सदस्य व रिपाइंचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अविनाश गायकवाड, मराठा महासंघ तालुका युवक अध्यक्षांनी १८ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तष्रार केली होती.

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस