शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

सोलापुरात पालेभाज्यांचे भाव तिपटीने कडाडले; कांदा, बटाटे अन् टोमॅटो मात्र स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 2:17 PM

ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा परिणाम थेट भाजीपाल्यांवर झाला आहे. याबरोबरच भाज्यांची आवक देखील घटली आहे.

ठळक मुद्देभाजीमंडईत काही भाज्यांना मागणीच नाही. काही भाज्यांचा दर मागील चार महिन्यांपासून स्थिर राहिलाया दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना तर पोहोचतोच. शिवाय हॉटेल, कँटीन, केटरिंग व्यावसायिक, मेसवाले, मंगल कार्यालयवाले यांना झळा पोहोचताहेत.किलोभर किंवा दोन पेंड्यांऐवजी एकाच पेंडीच्या खरेदीवर ग्राहक समाधान

सोलापूर : ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा परिणाम थेट भाजीपाल्यांवर झाला आहे. टोमॅटो, कांदा, बटाटे वगळता बाजारपेठेत बहुतांश पालेभाज्यांचे दर या आठवडाभरात चक्क तिपटीने वाढले आहेत. याबरोबरच भाज्यांची आवक देखील घटली आहे. किलोभर किंवा दोन पेंड्यांऐवजी एकाच पेंडीच्या खरेदीवर ग्राहक समाधान मानत असल्याच्या प्रतिक्रिया लक्ष्मी मंडईतील व्यावसायिकांतून उमटल्या.

मंद्रुप, नान्नज, तिºहे, कामती, बोरामणी, उळे, कासेगाव अशा उत्तर आणि दक्षिण सोलापूरसह मोहोळ तालुक्यातूनही शहराला भाज्यांचा पुरवठा होतोय़ दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वत्र पाण्याचा तुटवडा असल्याने पालेभाज्या उगवण्याऐवजी पेरलेले बियाणे जळून गेले आहे आणि उगवण कमी झाली़ परिणामत: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच भाजी मंडयांमध्ये पालेभाज्यांची आवक घटली आणि दर तिपटीवर पोहोचला़ भेंडी आणि दोडक्याचे दर या आठवडाभरात हळूहळू वाढत गेले.

या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना तर पोहोचतोच. शिवाय हॉटेल, कँटीन, केटरिंग व्यावसायिक, मेसवाले, मंगल कार्यालयवाले यांना झळा पोहोचताहेत.

गवारी उगवण्याआधीच जळाली - उन्हाळ्यात गवार उगवत असताना याला पाणी मोठ्या प्रमाणात लागते़ मात्र सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे़ अनेक शेतकºयांचे बोअरवेल बंद आहेत, बहुतांश शेतकºयांच्या बोअरवेलची पाणीपातळी पाचशे फु टाच्या खाली गेली आहे़ काही ठिकाणी गवार उगवलीच नाही़ जळून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे़ उन्हाळ्यात हे पीक शेतकºयाला बºयापैकी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून पाहिले जाते़.

वांग्याला उचल नाही- भाजीमंडईत काही भाज्यांना मागणीच नाही. काही भाज्यांचा दर मागील चार महिन्यांपासून स्थिर राहिला. परिणामत: साधी आणि काटेरी वांग्याची आवक पुरेशा प्रमाणात असूनही याला उठाव नाही़ अशीच स्थिती कांदा (१२ रुपये किलो), बटाटे (२० रुपये किलो), लसूण (४० रुपये किलो) यांच्याबाबत असल्याचे भाजीपाला व्यावसायिक सांगतात.

 मागील चार माहिन्यांत यांचे दर वाढलेले नाहीत. मे महिना अधिकच कडक आणि कोरडाठाक मानला जातो़ या काळात दरवर्षी भाज्यांचे दर भडकतात़ मात्र मागील पाच वर्षात प्रथमच दर तिपटीने कडाडले आहेत़ मे महिन्यात या सध्या बाजारपेठेत असलेल्या भाज्यांचे दर आणखी भडकतील, आवकही घटेल अशी स्थिती आहे़- सागर चव्हाण, भाजी विक्रेता

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार