मोहोळ तालुक्यातील काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. तर पंढरपूर येथील बायपासचे कामही वेगाने सुरू आहे. याच बायपास मार्गावर भीमा नदीवर सर्वात उंच पूलाची निर्मिती होत असून, या पुलाचेही काम सुरू झाले आहे. वाखरी ते पिराची कुरोली (टप्पा) या दरम्यान आषाढी यात्रा नजरेसमोर ठेवून कामाला गती दिली आहे. टप्पा ते वाखरी बायपास दरम्यान ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर असणारे ओढे, कालवे यावरील पूल उभारणीही सुरू आहे. काही ठिकाणी मोठे पूल आणि घरांचे पाडकाम सुरू असल्याने मार्गाचे अपूर्ण पॅचेस राहिले आहेत. येत्या महिनाभरात ती कामे पूर्ण होऊन मेअखेर पंढरपूर तालुक्यातील टप्पा ते वाखरी बायपासपर्यंतच्या महामार्गाचे काम पूर्ण होईल. यामुळे सध्या पालखी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येते.
येणारा पालखी सोहळा नवीन मार्गावरून..
आगामी आषाढी यात्रेसाठी येणारा पालखी सोहळा नवीन महामार्गावरून यावा, हे उद्दिष्ट समोर ठेऊन भूसंपादन आणि महामार्ग निर्मितीला गती दिली आहे. अनेक शेतकऱ्यांचे अंतर्गत वाद, विवाद स्वतः प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी स्थळ पाहणी करून तडजोडीने सोडवले आहेत. त्यामुळे पंढरपूर उपविभागीय क्षेत्रातील भूसंपादनाबाबतचे वाद कोर्टात जाण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. पालखी सोहळा येण्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, या उद्देशाने पाठपुरावा केल्याने महामार्गाचे काम गतिमान झाले आहे.
कोट :::::::::::::::::::::::
महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी मोठे सहकार्य केले. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया गतीने पार पाडता आली. बायपास मार्ग मोठा असून, या मार्गावरील मोठे उड्डाणपूल, भीमा नदीवरील पूल यांचीही कामे सुरू झाली आहेत. येत्या आषाढी पालखी सोहळ्यापूर्वी या मार्गाचे काम पूर्ण झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सचिन ढोले,
उपविभागीय अधिकारी, पंढरपूर
फोटो लाईन :::::::::::::::::::::
वाखरी ते बाजीराव विहीर या परिसरात वेगवान गतीने पालखी मार्गाचे काम सुरू असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.