कुर्डूवाडी : महसूल विभागाकडून माढा तालुक्यात लोकसहभागातून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालवन व पिंपळनेर या गावांचा अतिक्रमण झालेला साडेतीन किलोमीटरचा शिव रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे.
हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून बंद होता. त्यामुळे त्या परिसरातील ग्रामस्थांना आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी मोठी अडचण येत होती. महसूल विभागाने याची महाराजस्व अभियानात दखल घेऊन मंडल अधिकारी सुजित शेळवणे यांच्या पथकाने पालवन ते पिंपळनेर हा शिव रस्ता लोकसहभागातून खुला केला. यामुळे दोन्ही गावांमधील एकूण ४७ शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.
यावेळी मंडल अधिकारी सुजित शेळवणे, तलाठी नीलेश मुरकुटे, प्रवीण बोटे, माजी सरपंच परमेश्वर पाटील, किरण क्षीरसागर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. दोन्ही फोटो ओळ-२२कुर्डूवाडी-शिवरस्ता
महाराजस्व अभियानांतर्गत पालवन व पिंपळनेर या गावांचा सुमारे ३.५ किलोमीटरचा अतिक्रमण केलेला शिव रस्ता मंडल अधिकारी सुजित शेळवणे यांच्या पथकाने खुला केला.
---