माळशिरस : दिव्यांग व्यक्तींना मदत व सोबत घेऊन पुढे जाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून तपासणी, मार्गदर्शन, ऑनलाईन प्रमाणपत्र व वस्तू वाटप अशा अनेक योजना राबविल्या. पंचायत समितीने नेहमीच झुकते माप दिले आहे, असे मत पं. स. माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
तरंगफळ (ता. माळशिरस) येथे स्व. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील बहुउद्देशीय अपंग संस्थेतर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच माऊली कांबळे, पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे, ॲड. शांतीलाल तरंगे, भानुदास तरंगे, सुजीत तरंगे, जगूबाई जानकर, नारायण कर्चे, संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर, महादेव तरंगे, प्राचार्य संतोष शेंडगे, जयवंत तरंगे, सुनील पोरे, पपू कांबळे, येडगे मामा, दादासाहेब जानकर, ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे, श्रीनाथ माध्यमिक विद्यालयचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो :::
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील व मान्यवर.