पंढरपूर : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या भारतीय शिक्षिका.. उभं आयुष्य त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी वेचलं. त्याच पद्धतीनं पंढरपुरात ऑनलाईन शिक्षण घेता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही तरुणींनी सावित्रीबाई फुलेंचा वारसा जपत बिनभिंतीची शाळा भरवली आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे.
कोरोनामुळे सर्वत्र ऑनलाईन शिक्षण चालू आहे. श्रीमंत कुटुंबातील मुलांना मोबाईल, लॅपटॉप ही उपकरणे त्यांचे पालक सहज उपलब्ध करून देतात. परंतु ज्यांचे पोट हातावर आहे. रोजचा घर खर्च भागवणं अवघड आहे. अशा गरीब कुटुंबातील व झोपडपट्टी परिसरातील मुलांसाठी पंढरपुरातील काही तरुणींनी एकत्र येऊन बिनभिंतीची शाळा सरु केली आहे. या युवती राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले, किर्ती मोरे, डॉ. अमृता मेणकुदळे, सारिका गायकवाड, हर्षली परचंडराव, योगिता मस्के, अमृता शेळके आदींचा सहभाग आहे. या तरुणींना अजित पवार प्राथमिक विद्यालयातील सहकारी शिक्षिका अनुराधा पवार, वैष्णवी महामुनी याही शिक्षण देण्यास मदत करत आहेत.
या बिनभिंतीच्या शाळा दिवसाआड भरते. त्याठिकाणी ३५ विद्यार्थ्यी शिक्षण घेतात. त्यांना योग्यरित्या समजून सांगण्याचे काम या तरुणी करतात. तसेच मुलांना त्याठिकाणी येण्याची गोडी निर्माण व्हावी. यासाठी मुले शिक्षणासाठी यावीत, यासाठी मुलांना चॉकलेट, बिस्कीट देण्यात येतात. मुलांकडून कोणत्याही स्वरुपात फी न घेता तरुणी शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. यामुळे तरुणींकडून सावित्रीबाईंचा वारसा पुढे नेण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहेत.
एक रुपयेही नाही फीजगात सगळीकडे कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचे रोजगार बंद आहेत. पालकांकडे फी भरण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन देण्याइतपत सर्वांची परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना एक रुपयाही फी न घेता ऑनलाईन शिक्षण देत असल्याचे प्रा. श्रीया भोसले यांनी स्पष्ट केले.