पंढरपूर : १८ जुलै रोजी ११३ कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये ८७ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर २६ जणांचा अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाले आहे. यामध्ये शहरातील २१ तर ग्रामीण भागातील ५ लोकांचा समावेश आहे. यामुळे पंढरपुरातील एकूण बाधितांची संख्या १५७ झाली आहे.
१८ जुलैपर्यंत १५७३ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १५१० लोकांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आणखी ५४ जणांचे तपासणी अहवाल प्रलंबीत आहेत. तर १५७ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोविड केअर सेंटरमध्ये ९१ जणांवर तर उपजिल्हा रुग्णालयात १८ जणांवर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर सोलापूर ५, पुणे १, अकलूज १ असे एकूण ७ जण उपचार घेत आहेत. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या ३९ आहे. त्याचबरोबर २०० लोकांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करुन ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
या भागात आहेत पॉझिटिव्ह रुग्ण
तानाजी चौक ३, पोलीस लाईन २, रेल्वे स्टेशन १, आनंद नगर २, शिंदेशाही ४, महात्मा फुले चौक १, रोहिदास चौक ३, गांधी रोड १, गोविंदपुरा २, कडबे गल्ली (शेटे पेट्रोल पंपामागे) १, संतपेठ १, पुळूज (ता. पंढरपूर) १, एकलासपूर (ता. पंढरपूर) ४ या भागामध्ये एकूण २६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. रॅपीड अॅँटिजन टेस्टमध्ये १६ व आरटी-पीसीआर मध्ये १० असे एकूण २६ कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.