पंढरपूर : येथील एका डॉक्टरने महाराष्टÑातील विविध लोकांना दामदुप्पट पैसे देतो म्हणून लाखो रुपयांचा गंडा घातल्याबाबतचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. संबधित डॉक्टरचे नाव डॉ. राहुल ज्ञानदेव शेजाळ असे आहे.
डॉ. राहुल ज्ञानदेव शेजाळ (रा. ऋणानुबंध निवास सप्तश्रृंगी नगर, ढवळस रोड, मंगळवेढा, सध्या मुक्काम पुजारी सिटी घर नं२०५ इसबावी, पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी बिटॉँक्सीकॉँईन कंपनीचा ऐजंट असल्याचे अनेक लोकांना भासवले. तसेच त्यांच्याकडून वर्षात दामदुप्पट पैसे देतो म्हणून २०१८ साला मध्ये लाखो रुपये घेतले. यामध्ये पंढरपूर शहर, गुरसाळे, उपरी, गुरसाळे (ता. पंढरपूर), सोताली (ता. करमाळा), मंगळवेढा, डोंबवली (ठाणे) व औरंगाबाद येथील लोकांचा समावेश घेतले.
वरील गावातील सर्व लोकांची २२ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी डॉ. राहूल शेजाळ यांच्या विरुध्द मधुकर देशपांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात भादंविक ४०९, ४२०,५०४,५०६ सह पुरस्कार चिठ्ठी आणि पैशांची खप योजना बंदी अधिनियम १९७८ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा नोंद गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनि. दशरथ वाघमोडे हे करीत आहेत.