शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

Pandharpur Election Results : पंढरपूरचा अंतिम निकाल लांबणीवर, समाधान आवताडे पोहोचले मतमोजणी केंद्रावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 3:29 PM

Pandharpur Election Results : भाजपा समर्थकांनी पंढरपूर पोटनिवडणुकीचा विजयी जल्लोष सुरू केला आहे. मात्र, अद्याप अधिकृत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही. शेवटची म्हणजेच 38 वी फेरी अजून बाकी आहे.

ठळक मुद्देअधिकृत अंतिम निकाल थांबला आहे. त्यामुळे, उमेदवार समाधान आवताडे यांनी मतमोजणी केंद्रात धाव घेतली आह. 

सोलापूर - राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भाजपाच्या समाधान आवताडे यांनी सहाव्या फेरीनंतर शेवटपर्यंत आघाडी घेतली. अद्याप एक फेरी बाकी असून 37 फेरीअखेर भाजपाचे समाधान आवताडे यांनी 6010 मतांनी आघाडी घेतली आहे. मात्र, 38 व्या फेरीची मतमोजणी संथगतीने सुरू असल्याने अधिकृत अंतिम निकाल थांबला आहे. त्यामुळे, उमेदवार समाधान आवताडे यांनी मतमोजणी केंद्रात धाव घेतली आह. 

भाजपा समर्थकांनी पंढरपूर पोटनिवडणुकीचा विजयी जल्लोष सुरू केला आहे. मात्र, अद्याप अधिकृत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही. शेवटची म्हणजेच 38 वी फेरी अजून बाकी आहे. मात्र, मतमोजणी संथ गतीने सुरू असल्याने समाधान आवताडे केंद्रावर पोहोचले आहेत. राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, एकदा पिछेहाट झाल्यानंतर भगिरथ भालके हे शेवटपर्यंत आवताडेंची आघाडी तोडूच शकले नाहीत. भाजपानेही विजय निश्चित मानला असून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. मात्र, अद्यापही विजयाची अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे, पंढरपूर मतमोजणी केंद्रावर संभ्रमावस्था दिसत आहे.  

समाधान आवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात होते, पण इतर उमेदवारांना हजार मतंही घेणं अवघड बनलं होतं. समाधान आवताडे यांनी 19 व्या फेरीपर्यंत म्हणजे पढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील मतमोजणी होईपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. त्यानंतर, मंगळवेढा येथील मतमोजणीला सुरुवात होताच, त्यांच्या आघाडीच्या मतांमध्येही चांगली वाढ झाल्याचे सातत्याने दिसून आलं. अद्याप अधिकृत विजयाची घोषणा झाली नसली, तरी भाजपा नेते आणि समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे.  

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021BJPभाजपाSolapurसोलापूर