शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

Pandharpur Election Results : 15 व्या फेरीअखेर समाधान आवताडेंची मोठी आघाडी, 3800 मतांनी पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 10:26 AM

Pandharpur Election Results : Samadhan Avtade leads at the end of the ninth round, beating Bhalke : सकाळी आठ वाजता पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. या पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर होते.

ठळक मुद्दे भालकेंची पिछेहाट झाली असून आता नवव्या फेरीचा निकाल हाती आल्यानंतर समाधान आवताडेंनी चांगलीच आघाडी घेतल्याचं दिसून येतंय.

सोलापूर - राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालातील पहिल्या फेरीत पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालकेंनी आघाडी घेतली होती. मात्र, नवव्या फेरीअखेर भाजपाच्या समाधान अवताडेंनी भगिरथ भालकेंना मागे टाकले आहे.  Pandharpur Election Results : Samadhan Avtade leads at the end of the ninth round, beating Bhalke

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपाकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pandharpur Election Results Live: Bhagirath Bhalke leads in first round of postal votes)

सकाळी आठ वाजता पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. या पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर होते. यामध्ये भगीरथ भालके यांना २३१० मते, समाधान आवताडे यांना १३७२ मते, तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना ३० मते पडली आहेत. त्यानंतर, पाचव्या फेरीअखरे भगीरथ भालके ६५८ मतांनी आघाडीवर होते. मात्र, त्यानंतर भालकेंची पिछेहाट झाली असून आठव्या फेरीअखेर आवडतेंनी 2200 मतांची आघाडी घेतली आहे. आता नवव्या आणि दहाव्या फेरीचा निकाल हाती आल्यानंतरही समाधान आवताडेंनी आघाडी घेतल्याचं दिसून येतंय. आवताडे यांना नवव्या फेरीअखेर 2357  मतांची आघाडी मिळाली होती. तर, दहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर समाधान आवताडेंना 1838 मताची आघाडी मिळाली आहे.  त्यामुळे, येथील निवडणुकीत चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. ज्या भागात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना मताधिक्याची अपेक्षा होती, त्याच भागात समाधान आवताडे यांनी चांगली लीड घेतली आहे.

सोलापूर : 12 वी फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांना 1409 मतांची आघाडी

सोलापूर : भाजपचे समाधान आवताडे यांना अकराव्या फेरीअखेर 1503  मतांची आघाडी

सोलापूर : 15 वी फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे ३८०० मतांनी आघाडीवर

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा ही पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्रीमंडळातील बहुतांश मंत्र्यापासून प्रवक्ते अमोल मेटकरी यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी गाजवली. त्यांच्या प्रत्त्युरादाखल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बाळा भेगडे यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी गाजवली.

टॅग्स :Pandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021Electionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapurसोलापूर