मंगळवेढा : परिचारक कुटुंबाने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याबरोबरच सर्वसामान्यांची पत वाढवत राज्यातील अग्रगण्य साखर कारखाना, बँक असा नावलौकीक संपादन केला आहे. पारदर्शी काराभारास सर्वोच्च प्राधान्य देत सहकारात आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन झेडपीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांनी केले.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन नवी दिल्ली यांच्या वतीने वसंतदादा पाटील यांच्या नावे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बेस्ट चेअरमनआमदार प्रशांत परिचारक यांचा मंगळवेढा येथील पांडुरंग परिवाराच्यावतीने झेडपीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना आ प्रशांतराव परिचारक म्हणाले कै सुधाकरपंत परिचारक मालकाच्या आशीर्वादानेच हा एकपुरस्कार मिळाला. हा फक्त माझा सन्मान नसून पांडुरंग परिवारातील प्रत्येक घटकाचा सन्मान आहे अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी औदुंबर वाडदेकर, ईनुस शेख, भारत पाटील, अशोक माळी,गौरीशंकर बुरकुल, राजेंद्र चरणुकाका पाटील, नितीन पाटील, गोपाळ भगरे, काशिनाथ पाटील, धनंजय खवतोडे, सिद्धेश्वर कोकरे, पप्पू स्वामी, हेमंत निकम, बबलू सुतार, सिद्धेश्वर मामा कोकरे, सुरेश कलमाडी यांच्यासह पांडुरंग परिवारातील सदस्य उपस्थित होते.