पंढरपूर दि २४ : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीवर सहअध्यक्ष हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील धार्मिक विधी पार पाडण्यासाठी समितीच्या अध्यक्षांसह वारकरी संप्रदायाच्या चालीरिती व प्रथांची जाण असणाºया अनुभवी सदस्याच्या नियुक्तीसाठी सहअध्यक्ष पदाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या पदाच्या निर्मितीमुळे मंदिराचे व्यवस्थापन आता अधिक सुलभ होणार आहे. यासाठी पंढरपूर मंदिरे अधिनियम १९७३ मधील कलम २१ (१) क मध्ये सुधारणा करण्यासह २१ (१) ग अशी नवीन तरतूद समाविष्ट करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली.
पंढरपूर विठ्ठल - रूक्मिणी मंदिर समितीत आता सहअध्यक्ष पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 5:58 PM
पंढरपूर दि २४ : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीवर सहअध्यक्ष हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
ठळक मुद्देपंढरपूर मंदिरे अधिनियम १९७३ मधील कलम २१ (१) क मध्ये सुधारणा२१ (१) ग अशी नवीन तरतूद समाविष्ट करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मान्यता