पांडुरंग कारखाना जवळपास दैनंदिन ६७०० मे.टन उसाचे गाळप करीत आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात पूर्णवेळ कारखाना चालवून १० लाख मे. टन उसाचे गाळप करून ११ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांच्या उसाला उच्चतम दर देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे स्वप्न पांडुरंग साखर कारखान्याकडून खऱ्या अर्थाने साकार होत आहे. गाळपास आलेल्या उसाचे एफआरपीनुसार वेळेत पेमेंट अदा केले जात असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
पुढील वर्षीही ‘पांडुरंग’ची एफआरपी सर्वाधिक
गत व चालू हंगामात जिल्ह्यातील इतर सर्व कारखान्यांपेक्षा ‘पांडुरंग’चा साखर उतारा सर्वाधिक होता. त्यामुळे एफआरपी सर्वांत जास्त आहे. चालू गळीत हंगामात कोणत्याही परिस्थितीत गाळप हंगामात खंड पडू नये म्हणून संचालक मंडळाने व व्यवस्थापनाने लक्ष वेधले आहे. म्हणूनच ‘पाडुरंग’चा साखर उतारा यावर्षी जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा सर्वाधिक ११.४५ आहे. यामुळे पुढच्या वर्षी जिल्ह्यातील इतर सर्व कारखान्यांपेक्षा पाडुरंग कारखान्याची एफआरपी सर्वांत जास्त राहणार आहे. याचा ऊस उत्पादकांना फायदा होऊन अधिक दर मिळणार आहे.
कोट :::::::::::::::::::
पांडुरंग कारखान्याची यंत्रसामग्री कार्यक्षम करण्याचे काम झाले आहे. त्यामुळे गाळप हंगामात खंड न पडता प्रतिदिनी ६७०० मे. टन उसाचे गाळप होत आहे. आजअखेर दहा लाख मे. टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले. तोडणी प्रोग्रामचे काटेकोर पालन केल्याने उच्चांकी साखर उतारा मिळाला आहे.
- डॉ. यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक