कुसळंब : कोल्हापूर परिक्षेत्र अंतर्गत सोलापूर ग्रामीण अधीक्षक कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या वार्षिक तपासणीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल पांगरी पोलीस ठाण्याचा गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडलेल्या छोटेखानी समारंभात विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांना देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते. यावेळी २५ पोलीस ठाण्याच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. या कार्यपद्धती उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पांगरी पोलीस स्टेशनला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. या तपासणीत गुन्हे प्रगटीकरण, कायदा, सुव्यवस्था व अंमलबजावणी, कोरोना काळात जनजागृती, पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता व बाग, सीसीटीएनएस कार्यप्रणालीद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण, चोरी, दरोडे, खून यांसारखे गुन्हे उघडकीस आणले. या पडताळणीत पांगरी पोलीस स्टेशनचा दुसरा क्रमांक लागला. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट यांचा गौरव करण्यात आला.
----
फोटो : १६ पांगरी पोलीस स्टेशन
पांगरी पोलीस स्टेशनचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी मनोजकुमार लोहिया यांच्या हस्ते सुधीर तोरडमल यांना पारितोषिक देऊन गाैरविण्यात आले.