सोलापूर : सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाºया नवीपेठ बाजाराच्या समस्या संपता संपेनाशा झाल्या आहेत़ एकामागून एक येणाºया अडचणींना व्यापारी वर्ग सामोरे जात असताना आता मोकाट जनावरांच्या त्रासामुळे व्यापारी वैतागले आहेत़ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
सोलापूर शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नवीपेठेला मान आहे़ शहरासह ग्रामीण भागातील हजारो लोक खरेदीसाठी नवीपेठेत येतात़ कपडे, साड्या, ज्वेलरी, लहान मुलांचे ड्रेस, चप्पल, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संसारोपयोगी साहित्य आदी विविध प्रकारचे घरगुती साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच नवीपेठ़ या बाजारात मागील काही वर्षांपासून समस्याच समस्या असल्याचे दिसून येत आहे़ रस्ता, पाणी, स्वच्छतागृह, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, हॉकर्स चालकांची अरेरावी, महिलांची असुरक्षितता आदी विविध समस्या नवीपेठेत येणाºया प्रत्येक व्यापाºयांसह ग्राहकांना भेडसावत आहेत़ त्यामुळे व्यापाºयांसह ग्राहकांनी संबंधित प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे़ त्वरित मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता व्यापारी वर्गातून जोर धरू लागली आहे़
तात्पुरत्या उपाययोजना नकोत...- नवीपेठेतील समस्यांबाबत लोकमतने वृत्तमालिकेच्या माध्यमातून आवाज उठविला़ या वृत्तमालिकेची शहर पोलीस व महापालिकेच्या प्रशासनाने चांगलीच दखल घेतली़ समस्या सोडविण्याबाबत शहर पोलीस दल व महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत़ काही व्यापाºयांसह खोकेधारकांना अतिक्रमण काढण्यासाठीच्या नोटिसाही दिल्या आहेत़ बुधवारी शहर पोलिसांनी अतिक्रमण काढले खरे मात्र सायंकाळनंतर परिस्थिती जैसे थे दिसून आली़ त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी तोडगा निघेल यादृष्टीने पोलीस व महापालिकेच्या अधिकाºयांनी काम करावे, अशी मागणी नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे़
दुकानात जनावरे...- नवीपेठ परिसरात फिरणारी मोकाट जनावरे व्यापाºयांच्या दृष्टीने हे त्रासदायक ठरत आहे. एवढेच नव्हे तर ही जनावरे थेट दुकानात प्रवेश करून बाहेर लावलेल्या साहित्यांचे नुकसान करीत असल्याचे ‘लोकमत’च्या प्रतिनिधीसमोर निदर्शनास आले़ ग्राहकांना दुकानातील माल दाखविणाºया काही कर्मचाºयांना दुकानासमोर आलेली जनावरे हाकलण्यातच जास्तीचा वेळ घालवावा लागत असल्याचेही काही व्यापाºयांनी सांगितले़
ग्राहकांना त्रास- नवीपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना आता मोकाट जनावरांची भीती वाटू लागली आहे़ मागील काही दिवसांपासून नवीपेठेत मोकाट जनावरांची संख्या वाढू लागली आहे़ ग्राहक रस्त्यांवरून पिशवी घेऊन जात असेल तर ही मोकाट जनावरे खाण्यासाठी काही आहे का, या अपेक्षेने ग्राहकांची पिशवी ओढण्याचा प्रयत्न करतात़ त्यामुळे ही जनावरे मारतात की काय, या भीतीने ग्राहक पळून जाण्याचा प्रयत्न करतात़ काहीवेळा भीतीने पळण्याच्या नादात ग्राहक पडतानाचेही चित्र पाहावयास मिळाले़ यातून ते जखमीही होत असल्याचे गुरूवारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आले़
जनावरे प्रतिबंधक गाडी असतानाही महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही़ जुजबी कारवाई करायची अन् निघून जायायचे, एवढेच महापालिकेच्या अधिकाºयांना जमते़ मोकाट जनावरांचा खूपच त्रास नवीपेठेतील व्यापाºयांना होत असताना महापालिकेच्या अधिकाºयांकडून यावर सातत्याने दुर्लक्ष होत आहे़ कित्येक वेळा महापालिकेच्या अधिकाºयांच्या निर्दशनास आणून देखील कारवाई होत नाही़ सध्या जिल्हाधिकारी हे महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहतात, त्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे़- विजय पुकाळे,उपाध्यक्ष, नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर