शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पंत गेले वाडा पोरका जाहला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 2:24 PM

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारकांना श्रध्दांजली; सहवास लाभलेल्या नेत्यांनी जागवल्या आठवणी

केवळ पंढरपूर तालुकाच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला पंढरपूरच्या प्रदक्षिणा मार्गावरील वाडा मंगळवारी पोरका झाला. या वाड्यात आता कार्यकर्त्यांचे मोठे मालक अर्थात सुधाकरपंत परिचारक नसतील. असतील त्या केवळ त्यांच्या आठवणी. सुधाकरपंतांचा सहवास लाभलेल्या जिल्ह्यातील नेत्यांनी ‘लोकमत’कडे त्यांच्या आठवणी जागवल्या.

पंढरपूर तालुक्यात खर्डी येथे ५ आॅक्टोबर १९३५ साली  सुधाकरपंतांचा जन्म झाला. मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले लहानपणापासून समाजसेवेची वडील कै.रामचंद्र बाळकृष्?ण परिचारक व काका दिवान बहादुर कै. गोविंद उर्फ बाबासाहेब बाळकृष्ण परिचारक यांच्याकडून समाजसेवा व राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या वडिलांनी ३५ वर्ष खर्डी चे सरपंच म्हणून काम केले. तर काका पंढरपूर नगरपालिकेमध्ये अकरा वर्ष नगराध्यक्ष होते. वयाच्या विसाव्या वर्षी समाजकार्य व राजकारणामध्ये सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. सन १९६७ मध्ये पंचायत समितीची  पहिली निवडणूक लढवली त्यात ते पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांची निवड झाली. सन १९७२ ला सोलापूर जिल्हा परिषदेचे ते सदस्य म्हणून निवडून गेले. १९७८ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले. त्यानंतर १९८५ ते २००९ या कालावधीत ते पंढरपूचे आमदार होते. २००९ साली त्यांनी शरद पवारांच्या आदेशाानुसार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी आपल्या उमेदवारीचा त्याग केला. २०१९ साली ते पुन्हा निवडणूक रिंगणाात उतरले होते. मात्र त्यांचा पराभव झाला.

च्पंढरपूर तालुक्यातील पहिल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा वाटा होता. पंढरपूर मधील अनेक सामाजिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९८६ साली राज्य शासनाने त्यांचीमोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी कारखान्याचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली. कारखाना डबघाईला आलेला असताना त्यांनी त्याला ऊर्जितावस्थेत आणून प्रगतीपथावर पोहोचवले. जिल्ह्यातील आजारी उद्योगांचे ते डॉक्टर ठरले. त्यामुळे शरद पवारांनी त्यांना सन २००० साली राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले. त्यांनी एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढले: 

च्दि पंढरपूर अर्बन को-आॅपरेटिव बँकेचा कारभारही परिचारक यांच्याकडेच होता.  सन १९७५ ते १९८९  अशी १४ वर्षे बँकेचे चेअरमन म्हणून काम केले. सन १९८३ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबईचे संचालक म्हणून निवड झाली.पंढरपूरमध्ये गणेश रुग्ण सेवा मंडळ स्थापन करून या संस्थेमार्फत मूकबधिर व मतिमंद विद्यालय सुरू केले. पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्फत उमा महाविद्यालयाची स्थापना केली.

च्सन १९९३ मध्ये परिचारकांनी आगाशे उद्योगसमूहाचा श्रीपूर ता. माळशिरस येथील साखर कारखाना खरेदी केला. एका खासगी कारखान्याचे रुपांतर त्यांनी सहकारी साखर कारखान्यामध्ये केले. हा कारखाना राज्यातील सर्वाधिक उस देणाºया कारखान्यापैकी एक आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर