याबाबत आ. राऊत यांचे स्वीय सहायक प्रशांत खराडे यांनी शहर पोलिसात त्याच्याविरुद्ध भादंवि ५०७ प्रमाणे तक्रार दिल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
त्याबाबत शहर पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांना कळविताच त्यांनीही नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना तातडीने कळविले. याचा बार्शी शहर पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस शिवाजी कांबळे, श्रीमंत खराडे यांनी केलेला तपासी अहवाल पनवेल येथे जाऊन दिला. त्यावर तेथील पोलिसांच्या साहाय्याने सुधीर अनपट याला ताब्यात घेऊन पनवेल सपोनि गणेश दळवी यांनी सहायक पोलीस आयुक्तांसमोर उभे केले असता वरील आदेश दिला.
दिलेल्या तक्रारीत भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू न देण्याची धमकी ३ मार्च रोजी फेसबुक लाईव्हद्वारे दिली होती. तसेच यांच्याविरुद्ध राजकारण कराल व त्यांच्या केसाला धक्का लावला तर जिवंत सोडणार नाही. असे म्हणून तलवारीने मारण्याची भाषा करून धमकी दिली होती.
त्यावरून हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी पनवेल पोलिसाकडे त्यास ताब्यात घेऊन पनवेल पोलीस उपनिरीक्षक गणेश दळवी यांनी सहायक पोलीस आयुक्तांसमोर उभे केले होते.
----