शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

सोलापुर शहरातील पार्किंग समस्येमुळे बाजारपेठांवर प्रचंड परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 6:20 PM

रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : ‘ओ मामा, इथे गाडी लावू नका’, त्या दुकानदाराचा सल्ला मानून तो ग्राहक दुचाकी ढकलतच पुढे ...

ठळक मुद्दे ‘लोकमत’चमूने शहरातील पार्किंग यंत्रणेवर प्रकाश टाकलारस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे बाजारपेठ प्रचंड अस्वस्थ

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : ‘ओ मामा, इथे गाडी लावू नका’, त्या दुकानदाराचा सल्ला मानून तो ग्राहक दुचाकी ढकलतच पुढे कुठेतरी लावण्याचा प्रयत्न करीत असतानाच दुसरा लगेच ओरडतो, ‘अहो काका, इथे नको. पोलीस उचलून नेतील’. त्यालाही तो सल्ला पटतो अन् काय करावं काय नाही, या चिंतेतच त्याने गाडी किक मारत तेथून निरोप घेतला.

 हा प्रसंग मनात साठवून ‘लोकमत’चमूने शहरातील पार्किंग यंत्रणेवर प्रकाश टाकला. आॅन दि स्पॉट रिपोर्टिंगवेळी रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे बाजारपेठ प्रचंड अस्वस्थ झाल्याचे निदर्शनास आले. 

दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी सात रस्ता येथून चमू निघाला. संगमेश्वर महाविद्यालयापासून ते पुढे जुना एम्प्लॉयमेंट चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहने बिनधास्तपणे लावण्यात आली होती. दुचाकी गाड्या मात्र कमी प्रमाणात आढळल्या. रस्त्यावरच पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांना जॅमरही बसविण्याचे साधे कष्टही वाहतूक पोलिसांचे दिसून आले नाही. कामत हॉटेल ते हेडगेवार रक्तपेढीपर्यंतच्या व्यापारी आणि ग्राहकांसाठी महापालिकेच्या सह्याद्री शॉपिंग सेंटरमध्ये खास पार्किंगची व्यवस्था पाहावयास मिळाली. तरीही दुपारी १२ वाजून २७ मिनिटांनी या मार्गावर एमएच-१३/एसी-७६५२, टीएस-०९/ईजे-१८९२ आणि एमएच-१२/एफके-७४६० ही तीन चारचाकी (कार) वाहने थांबलेली चमूने कॅमेºयात बंदिस्त केली. हेडगेवार रक्तपेढीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोबाईल विक्रेत्यांनी         मात्र पार्किंग नसल्याची खंत व्यक्त करताना ग्राहक दुरावल्याचे मोबाईल विक्रेते महेश चिंचोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गर्दीच्या बाजारपेठांमध्ये श्वास गुदमरतोय...- शहरातील चाटी गल्ली, कुंभार वेस, सराफ बाजार, मधला मारुती, टिळक चौक, कोंतम चौक, माणिक चौक या चौकांमध्ये जुन्या काळापासून बाजार भरतोय. विस्तारलेल्या शहरातील ग्राहक खास खरेदीसाठी या बाजारपेठांमध्ये येत असताना त्यांनाही पार्किंगच्या समस्या भेडसावत आहेत. मंगळवारपेठ पोलीस चौकी ते मधला मारुती हा एकतर एकेरी मार्ग. ज्या वस्तू, साहित्य, वनौषधी कुठेच मिळत नाही, त्या सर्वच वस्तू इथे मिळतात; मात्र ग्राहकांना दुचाकी कुठे लावावी, हा प्रश्न नेहमीच भेडसावतो. रस्त्यावर बसलेले किरकोळ विक्रेते, लावण्यात आलेल्या वाहनांमुळे या प्रमुख बाजारपेठांसाठी महापालिकेने पार्किंगची व्यवस्था करावी, असा सूर या भागातील व्यापाºयांमधून ऐकावयास मिळत होता. 

‘किसमे कितना है दम !’ पोलिसांना इशारा- दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी चमू टिळक चौकात पोहोचला. तेथील काही व्यापारी, ग्राहकांना बोलते केले असता ते म्हणाले, ‘साहेब, आमच्या गाड्या उचलतात. मग वाहतूक पोलिसांना टिळक चौकातील अगदी मध्यभागी बसून चुना विकणारे विक्रेते दिसत नाही का ? त्यांच्यावर कधीच कारवाई होत नाही. वाहतूक पोलिसांमध्ये दम नाही का ? असे प्रश्न मांडत असताना एकाने ‘किसमे कितना है दम’ असे म्हणून थेट वाहतूक पोलिसांनाच आव्हान दिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरParkingपार्किंगSmart Cityस्मार्ट सिटीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस