उस्मानाबाद येथील सिना-कोळेगाव धरणामध्ये केरळ व आंध्र प्रदेश येथील मच्छीमारांना मच्छीमारीसाठी परवाना असल्याने करमाळा व परांडा तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली असल्याने अतुल खुपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती संघटनेने ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनस्थळी सहा.आयुक्त वाघमोडे गैरहजर राहिल्याने वैतागलेल्या आंदोलकांनी सहा.आयुक्तांच्या खुर्चीला मत्स्याहार घालून अर्धनग्न आंदोलन करत कार्यालय ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आंदोलकांनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे पोलीस प्रशासनाने वरिष्ठांशी संपर्क साधला. यावेळी मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त बिराजदार यांनी वरिष्ठ आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवून कामामध्ये हयगय करणाऱ्या सहायक आयुक्त वाघमोडे यांच्यावर कारवाई करून त्वरित बदली करण्यात यावी, असा प्रस्ताव पाठविला आहे. शिवाय स्थानिक मच्छीमार यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यादेखील या प्रस्तावामध्ये पाठविल्या असून, दि. ७ सप्टेंबर रोजी याबाबत सविस्तर बैठक घेऊन स्थानिक मच्छीमारांना परवानगी देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
..............
अन् आंदोलन चिघळले
सहा.आयुक्त वाघमोडे हे आंदोलन स्थळी येतो म्हणाले मात्र त्यांनी जाणीवपूर्वक भ्रमणध्वनी बंद ठेवल्याने आंदोलन आणखीनच चिघळले व आंदोलकांनी प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर जाऊन घोषणाबाजीला सुरुवात केली. शेवटी रात्री २ वाजता झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी आज सकाळी रक्तदान आंदोलनाला सुरुवात केली. प्रशासकीय इमारतीवरून उतरून काहीजण रक्तदानासाठी, काहीजण जेवणासाठी गेले असता हीच संधी साधून आंदोलकांना पोलिसांनी उचलून धरपकड करीत गाडीत कोंबले व पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
...............
फोटो ओळी
सहायक आयुक्तांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करताना जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते.
(फोटो ०५करमाळा मच्छीमार)