सोलापूर : कर्नाटक राज्यात जाण्यापूर्वी सोलापुरातील नागरिकांनी आरटी-पीसीआर टेस्ट करून घ्या, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले आहे.
अधिक माहिती देताना संजीव जाधव यांनी सांगितले, कोरोनाच्या वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर कलबुर्गी जिल्ह्याचे अपर जिल्हा दंडाधिकारी डॉ. शंकर गौडा यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला आहे. कलबुर्गी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह असा अहवाल असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असे गौडा यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर कलबुर्गी जिल्हा तसेच गाणगापूर इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांनी स्वतःची आरटी-पीसीआर टेस्ट करून घ्या, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी जाधव यांनी केले आहे.