योग्य ठिकाणी जाण्यासाठी स्थानकात लागणारी गाडी किती वाजता आहे, कुठल्या फलाटावर थांबणार आहे आदींची माहिती घेण्यासाठी प्रवाशांची चौकशी खिडकीवर झुंबड उडायची. ही गर्दी कमी करण्यासाठी एस. टी. प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेल्या पीआयएस प्रणालीचा चांगला प्रभाव दिसत आहे. यामुळे प्रवाशांना पुढे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाडीबद्दलची माहिती स्क्रीनवर मिळत आहे. यावर गाडी येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेबरोबर गाडी कोणत्या फलाटावर थांबेल, याची माहितीही देण्यात येते. सोबतच काही अत्यावश्यक सूचनाही वेळोवेळी देण्यात येतात़ गाडीच्या मार्गाची माहिती स्पीकरद्वारेही सांगितली जाते.
ज्या प्रवाशांना स्क्रीनवरील माहिती समजत नाही, अशांनी चौकशी खिडकीवर जाऊन याची माहिती मिळवू शकतील. अशी माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ग्रामीण स्थानकात स्क्रीन बसवावे
या माहितीसाठी सोलापूरच्या मध्यवर्ती स्थानकात चार मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. पण अद्यापपर्यंत ग्रामीण स्थानकात एकही स्क्रीन लावण्यात आले नाही.यामुळे प्रवाशांकडून ग्रामीण स्थानकातही स्क्रीन बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.