माढा तालुक्यात सध्या १ हजार ४२१ रुग्ण हे कोरोनाबाधित असून ते विविध कोविड केअर सेंटरमधून उपचार घेत आहेत. यातील होम क्वारंटाईनमध्ये ९४६, कोविड केअर सेंटरमध्ये २८५, डेडिकेटेड सेंटरमध्ये १७१, तालुक्याबरोबरील सेंटरमध्ये १६, डीसीएचमध्ये ३ रुग्ण उपचार घेत आहेत. या बाधित रुग्णसंख्येवरून तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग सरासरी रेट हा कमी होऊ लागल्याचे एकीकडे दिसून येत आहे.
परंतु दुसरीकडे ॲन्टिजेन किट तपासणीसाठी उपलब्ध नसल्याने ही आकडेवारी वरचेवर कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
तालुक्यात ऑक्सिजन,व्हेंटिलेटर व साधे बेड म्हणून विविध सेंटरमधून उपलब्ध असणाऱ्या ८६० बेडपैकी सध्या ४१३ बेड मंगळवारी सायंकाळपर्यत शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाच्या रिपोर्टवरून दिसून आले.
गेल्या एक दोन आठवड्यात बेडसाठी वेटिंग करणारी मंडळी दिसून येत होती. आता मात्र प्रत्येक सेंटरमध्ये बेड निम्याने शिल्लकच दिसून येत आहेत. माढा तालुक्यात दहा डेडीकेटेड हॉस्पिटल आहेत. त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय माढा, डॉ. साखरे हॉस्पिटल कुर्डूवाडी, डॉ. बोबडे हॉस्पिटल कुर्डूवाडी, आधार हॉस्पिटल कुर्डूवाडी, यशश्री हॉस्पिटल टेंभुर्णी, पाटील हॉस्पिटल टेंभुर्णी, जयश्री हॉस्पिटल टेंभुर्णी, अश्विनी हॉस्पिटल टेंभुर्णी ,अपूर्वा हॉस्पिटल, कुर्डूवाडी,सर्वेश हॉस्पिटल, कुर्डूवाडी, मित्रप्रेम हॉस्पिटल माढा यांचा समावेश आहे. कोविड केअर सेंटर संख्याही दहा आहे. त्यामध्ये श्रीराम मंगल कार्यालय भोसरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह कुर्डूवाडी,संकेत मंगल कार्यालय टेंभुर्णी, मुलींचे वसतिगृह, कुर्डूवाडी, स्वामी समर्थ मंगल कार्यालय मोडनिंब, सावता माळी टेंभुर्णी, पांडुरंग रुक्मिणी वसतिगृह रोपळे, जिल्हा परिषद शाळा कुर्डू, जिल्हा परिषद शाळा लऊळ, तुळजाभवानी मंगल कार्यालय माढा यांचा समावेश आहे.
यात सर्व डेडीकेटेड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व साधे बेड उपलब्ध आहेत. सध्या त्यातील उपलब्ध ३०१ विविध बेडपैकी १४१ शिल्लक आहेत. तर सर्व कोविड केअर सेंटरमधील उपलब्ध ५५९ बेडपैकी ३०६ बेड हे सद्यस्थितीत शिल्लक आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांनी सध्या होम आयसोलेशन न होता कोविड केअर सेंटर अथवा डेडीकेटेड हॉस्पिटलमधील उपलब्ध सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांनी लोकमतशी बोलताना केले.
----
कोरोना रेख १२.५८
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी,माढा,मोडनिंब व टेंभुर्णी या मुख्य शहरासह ग्रामीणच्या विविध भागांतून लसीकरणाचा पहिला डोस घेतलेले २७ हजार ३३ तर दुसरा डोस पूर्ण झालेले ५ हजार ९६८ असे एकूण लसीकरण पूर्ण झालेले लाभार्थी ३३ हजार ०१ आहेत.तर संपूर्ण तालुक्यातून आतापर्यंत १ लाख ५ हजार ३७४ नागरिकांनी लसीकरणाबाबत नोंदणी केली आहे. तालुक्याचा कोरोना बाधित रेट हा १२.५८ इतका असून मृत्यू रेट हा २.११इतका आहे.त्यात काँटॅक्ट ट्रेस रेट हा १०.५० इतका आहे.
----
माढा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी होम आयसोलेशन न राहता शिल्लक बेड आहेत तिथे सेवा घ्यावी. त्यातून रुग्ण लवकर बरा होऊन ठणठणीत होईल. घरात राहण्यापेक्षा कोणत्याही उपलब्ध केअर सेंटर मध्ये ऑक्सिजन,व इतर औषध उपचार हे व्यवस्थित आहेत.त्याचा लाभ तालुक्यातील बाधित रुग्णांनी घ्यावा.
- डॉ. शिवाजी थोरात,तालुका आरोग्य अधिकारी, माढा.
----