शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

केगावच्या केंद्रात बेचव अन्नाला रुग्ण कंटाळले; कुंभारीच्या केंद्रात मृतदेहाला संशयित घाबरले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:13 AM

तक्रारींचा व्हिडिओ व्हायरल; कोरोनाग्रस्तांच्या केंद्रात संशयितांना परस्पर पाठविले जाते; सरकारी कारभारापुढे रुग्णालय प्रशासनही हतबल

ठळक मुद्देअश्विनी रुग्णालय हे मुळात कोवीड १९ रुग्णालय म्हणून जाहीर  करण्यात आले आहेरुग्णालयात ५० कोरोनाचे तर ५० संशयित रुग्णांना प्रवेश दिला जात आहेपोलीस प्रशिक्षण केंद्रातील काही संशयितांचे अहवाल इन्कन्क्लुझिव्ह येत आहे

सोलापूर : कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांपैकी काही जणांनी आपल्या नातेवाईकांसमोर आपली कैफियत मांडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच सोलापूर-पुणे रोडवरील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या क्वारंटाईन केंद्रातही यंत्रणा ढासळत चालल्याचा आरोप येथील काही रुग्णांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे.

कुंभारीच्या रुग्णालयामध्ये प्यायला पाणी मिळत नाही, स्वच्छतेचा अभाव आहे. तसेच मृतदेह एक दिवसांपासून रुग्णालयातून हलविला नसल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. दरम्यान, केगांवच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये संशयित रूग्णांना बेचव अन्न मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. क्वारंटाईनची मुदत पूर्ण होऊनही सतरा - सतरा दिवस घरी सोडत नसल्याची कैफियतही मांडण्यात आली आहे.

 कुंभारीत भेटायला आलेल्या नातेवाईकांना दूरुनच त्यांनी कैफियत मांडली.आत्तापर्यंत डॉक्टरांनी संशयित रुग्णांना तपासले नाही. एकच परिचारिका दिवसातून एकदा वॉर्डामध्ये येते. एकदाच औषधे देऊन जाते. डॉक्चर कसे आहेत हे आम्ही पाहिलेच नाही. कमीत कमी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायली हवी. तिदेखिल रुग्णालय प्रशासनाकडून केली जात नाही. खूप उशीराने प्ययला पाणी मिळते. यापेक्षा वाईट म्हणजे वॉर्डामध्ये एक दिवस मृतदेह तसाच पडून होता. त्या मृतदेहाचा वास येत असतानादेखिल वेळेवर हलवले नाही, असे हे रुग्ण सांगत होते. नातेवाईकांना उद्देशून रु ग्णांनी त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. 

दरम्यान, यापुर्वी सिव्हिल रुग्णालय यादी पाठवत होते, पण आता ती यादी पाठविली जात नाही. अश्विीनी रुग्णालयाकडे रुग्णाचा स्वॅब तसापणी केली जात नाही. सिव्हील हॉस्पीटलकडून चाचणीची अहवाल यायला उशीर होतो. रुग्णालयात कोवीडसोबतच इतरही रुग्ण आहेत. त्यांना कोरोनाचा धोका पोहोचू नये म्हणून रुग्णांना बाहेर सोडू दिले नाही, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

तसेच केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या क्वारंटाईन केंद्रात लहान मुले, वयस्कर व्यक्ती आणि महिला या साºयांनाच एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे़ त्यांच्यामध्ये कसलेही फिजिकल डिस्टन्स दिसत नाही़ बेचव अन्न कोणीच पूर्णत: खात नाही़ शिवाय सकाळचा चहाही १० वाजता दिला जात आहे. जेवण ३ वाजता मिळते. अशी तक्रार आहे. त्यामुळे बºयाच प्रमाणात अन्नाची नासाडी होत आहे़ आजमितीला येथील संशयित रुग्णांची संख्या ही ९० वर आहे आणि सार्वजनिक शौचालयाची संख्या केवळ २० आहे़ येथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही. 

रुग्णांना बाहेर न सोडल्याने तक्रार केली : रुग्णालय प्रशासन- कुंभारी येथील अश्वीनी रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले आहेत. सकाळी मृत झालेल्या रुग्णांचा मृतदेह कागदोपत्रांची पुर्तता केल्यानंतर लगेच हलवला. कोरोना संशयित रुग्णांना बाहेर जाऊ न दिल्याने ते आरोप करत आहेत. रुग्णालात टँकरने पाणी आणले जाते. याला थोडा उशीर झाला. मात्र, नाश्ता, जेवण हे रुग्णांना वेळच्या वेळी पुरविले जाते. डॉक्टर हे ४५ अंश सेल्सीअस इतक्या तापमानात सलग सहा तास आपले कर्तव्य बजावत आहेत, असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

अश्विनी रुग्णालय हे मुळात कोवीड १९ रुग्णालय म्हणून जाहीर  करण्यात आले आहे. तरीदेखिल प्रशासनाकडून संशयित रुग्णांना पाठविण्यात येते. रुग्णालयात ५० कोरोनाचे तर ५० संशयित रुग्णांना प्रवेश दिला जात आहे. मात्र, काही रुग्ण परस्पर अश्विीनी रुग्णालयाकडे येतात. मात्र आमची क्षमताच एवढी असल्याने जास्त रुग्ण आम्ही घेऊ शकत नाही. सध्या कोरोना संशयित रुग्णांचे बेड हे पुर्ण भरले आहेत.- डॉ. माधवी रायते, अधिष्ठाता, अश्विनी रुग्णालय, कुंभारी 

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील काही संशयितांचे अहवाल इन्कन्क्लुझिव्ह येत आहे. अर्थात धड पॉझिटिव्हही नाही अन् निगेटिव्हही नाहीत. त्यामुळे त्यांचे पुन्हा स्वॅब घ्यावे लागते. तोपर्यंत त्यांना घरी सोडता येत नाही. याठिकाणचे जेवण हे एका केटरिंगला देण्यात आले आहे. एकाच ठिकाणचे अन्न खाऊन बेचव वाटत असावे.- डॉ. संतोष नवले, शहर आरोग्य अधिकारी, महानगरपालिका

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल