स्वाभिमानीची उपविभागीय अधिका-यांकडे धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
कुर्डूवाडी : टप्पे न पाडता एफआरपीची रक्कम एकरकमी द्या, यासाठी माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शेतकरी विविध संकटांना सामोरे जात आहे. कुठल्याही शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही. स्वामिनाथन आयोग लागू झाला नसल्याने केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधात आहे. राज्य सरकारने मोफत वीज व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले. मात्र ऐन उन्हाळ्यात शेतक-यांची वीज कापण्याचे महापाप त्यांनी केल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष अजिनाथ परबत, जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे, तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, मच्छिंद्र बोरकर आदी उपस्थित होते.
---
फोटो : २५ कुर्डूवाडी
एफआरपीच्या रकमेसंदर्भात कुर्डूवाडीच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना शिवाजी पाटील, अजिनाथ परबत, सिद्धेश्वर घुगे, सत्यवान गायकवाड.
250921\img-20210923-wa0369.jpg
कुर्डूवाडी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्याकडे एफआरपीची रक्कम एकरकमी द्या ही निवेदनाद्वारे मागणी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पदाधिकारी.