सांगोला : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतची क्रमिक पुस्तके समजून घ्यावीत. या परीक्षेची तयारी करताना कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य, चालू घडामोडी या गोष्टीवर लक्ष देण्याचा कानमंत्र विक्रीकर निरीक्षक उमाकांत ननवरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मंगळवारी विक्रीकर निरीक्षक ननवरे व्याख्यानप्रसंगी बोलत होते.
संस्थापक अध्यक्ष बाबूराव गायकवाड, ज्येष्ठ विश्वस्त महादेव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड यांच्या उपस्थिती हा झालेल्या कार्यक्रमात ननवरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
त्यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससी परीक्षेमधून विविध प्रशासकीय सेवा व पदांसंदर्भात माहिती दिली.
यावेळी प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख, उपप्राचार्य व्ही. एम. गायकवाड, एम. व्ही. गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. एस. एम. सावंत यांनी मानले. (वा. प्र.)
------