चपळगाव : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर्सने अनेक अडचणींवर मात करीत गतवर्षी गाळपास आलेल्या उसाला एफआरपीनुसार ऊस बिल, तोडणी बिल, वाहतूक बिल व कारखाना कामगारांचे वेतन अदा केल्याची माहिती चेअरमन गणेश माने देशमुख यांनी दिली.
शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा संकटाच्या काळात जयहिंद शुगरने संपूर्ण ऊस बिल, तोडणी बिल, वाहतूक बिल, कामगार वेतन अदा करून सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे. साखर कारखानदारांपुढे अनेक अडचणी उभ्या आहेत. यावर मात करीत जयहिंद शुगरकडून सर्व बिल अदा करण्यात आल्याने ऊस उत्पादक शेतकरी, वाहनमालक व टोळी मुकादम व कारखाना कामगारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख, मुख्य व्यवस्थापक बब्रूवान माने-देशमुख व व्हाइस चेअरमन विक्रमसिंह पाटील यांनी ऊस बिल अदा करण्यासाठी पुढाकार घेतला. गतवर्षीच्या उसाला जयहिंद शुगरकडून एफआरपीनुसार २०५७ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. आज सरासरी २१०० रुपये प्रतिटन दर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने डोंबरजवळगे येथील वाहतूकदार मेघराज दुलंगे, चपळगाव येथील शेतकरी बसवराज हन्नुरे, नोकरदार सुमित पाटील, डोंबरजवळगे येथील वाहतूकदार मेघराज दुलंगे, चपळगाव येथील शेतकरी बसवराज हन्नुरे आदी ऊस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
----
अनेक अडचणींमुळे गतवर्षी गाळपास आलेल्या ऊसाचे बिल देण्यास यंदा नक्कीच उशीर झाला आहे; परंतु यापुढे मात्र शेतकऱ्यांच्या उसाला योग्य वेळी व योग्य दर देण्यास जयहिंद शुगर कटिबद्ध आहे. कारण येत्या गाळप हंगामात इथेनॉल प्रकल्प सुरू होणार आहे, तसेच कारखान्याची ऊस गाळप क्षमताही वाढविण्यात आली आहे.
-गणेश माने-देशमुख, चेअरमन-जयहिंद शुगर कारखाना
040921\fb_img_1624340252965.jpg
जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांचा फोटो