शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

कर्जमाफीचे साडेसहा हजार कोटीहून अधिक रक्कम बँकाकडे पडून, कर्जमाफीची रक्कम परत देण्याच्या सुचना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 2:12 PM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीसाठी विविध बँकांकडे मोठ्या प्रमाणावर पडून असलेल्या रकमा परत करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. अशा प्रकारची साडेसहा हजार कोटींहून अधिक रक्कम बँकांकडे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देशेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करत नसाल तर ती परत पाठवून द्या, अशा सूचना शासनाने बँकांना दिल्यासोलापुरात २५० कोटी शिल्लक राज्यातील ८९ लाख शेतकºयांपैकी कर्जमाफीसाठी ७७ लाख २९ हजार खातेदारांनी आॅनलाईन अर्ज भरले होते

अरुण बारसकरसोलापूर दि २  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीसाठी विविध बँकांकडे मोठ्या प्रमाणावर पडून असलेल्या रकमा परत करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. अशा प्रकारची साडेसहा हजार कोटींहून अधिक रक्कम बँकांकडे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करत नसाल तर ती परत पाठवून द्या, अशा सूचना शासनाने आज बँकांना दिल्या आहेछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीसाठी शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे शासनाने पैसे दिले आहेत. राष्टÑीयीकृत तसेच जिल्हा मध्यवती  बँकांना शासनाने शेतकºयांची ‘ग्रीन’ यादी सोबत पैसेही दिले आहेत. कर्जमाफीच्या चार याद्या बँकांना दिल्या असून यापैकी पात्र शेतकºयांच्या खात्यावर बँकांनी पैसे जमा केले आहेत. आॅनलाईन केलेल्यापैकी शासनाने बँकांना दिलेल्या याद्यांच्या तपासणीत त्रुटी आढळलेल्या शेतकºयांची यादी शासनाला परत पाठविण्यात आली आहे. या सर्व प्रकारात बँकांनी पात्र शेतकºयांच्या खात्यावरही रकमा जमा केल्या नसल्याने शिल्लक रक्कम शासनाकडे जमा करण्याच्या सूचना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बँकेच्या अधिकाºयांना दिल्या आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत शिल्लक रक्कम परत जमा करण्यास सांगण्यात आले होते. ------------------११ हजार शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा- शुक्रवारपर्यंत शासनाने राष्टÑीयीकृत व जिल्हा बँकांना  ३९ लाख ८९ हजार ७२९ शेतकºयांची यादी व १७ हजार ७०५ कोटी ७० लाख १४ हजार ८२८ रुपये दिले होते. - बँकांनी सोमवारपर्यंत २९ लाख  १  हजार   शेतकºयांच्या  खात्यावर ११ हजार ४६८  कोटी  रु पये जमा केले  असल्याचे  सांगण्यात   आले.- शुक्रवारपर्यंत राष्टÑीय बँकांना दिलेल्या यादीपैकी ५ लाख ६७ हजार २०५ व जिल्हा बँकांनी ७ लाख ७ हजार २३८ शेतकºयांच्या खात्यावर जमा केली नव्हती.- शुक्रवारपर्यंत राष्टÑीय बँकांकडे ३३७८ कोटी ९१ लाख ८८ हजार ६२९ रुपये तर जिल्हा बँकेकडे  ४९४५ कोटी ८९ लाख ७ हजार ८३३ रुपये असे ६६८० कोटी ६८ लाख २२ हजार २६३ रुपये शिल्लक होते. -----------------सोलापुरात २५० कोटी शिल्लक सोलापूर जिल्ह्यासाठी राष्टÑीय व जिल्हा बँकेला दिलेल्या एक लाख ४७ हजार ५९७ शेतकºयांची यादी व ७२९ कोटी ४३ लाख ८९ हजार ९५८ रुपये दिले होते. यापैकी बँकांनी शुक्रवारपर्यंत ८० हजार १९८ शेतकºयांच्या खात्यावर ४३५ कोटी ९९ लाख ५९ हजार ६६४ रुपये जमा करुन ६७ हजार ३९९ शेतकरी व २९३ कोटी ४४ लाख ३० हजार २९४ रुपये शिल्लक होते. सोमवारपर्यंत २५० कोटींपर्यंत रक्कम शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.--------------  ५६ लाख ५९ हजार कुटुंबांचे अर्ज राज्यातील ८९ लाख शेतकºयांपैकी कर्जमाफीसाठी ७७ लाख २९ हजार खातेदारांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. अर्ज भरलेल्यांची कुटुंबसंख्या ५६ लाख ५९ हजार इतकी होते. एकापेक्षा अधिक अर्ज भरलेले व निकषात न बसणारे ८ लाख ३९ हजार खातेदार अपात्र ठरले. अर्ज भरलेल्यांपैकी ६८ लाख ९० हजार शेतकºयांचे अर्ज पात्र झाले आहेत.  

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक