सोलापूर : सोशल साईटवरील महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह छायाचित्रे टाकल्याचे पडसाद सलग दुसर्या दिवशी सोलापुरात उमटले़ सकाळपासून कार्यकर्त्यांच्या आवाहनानंतर नवीपेठेतील व्यापार्यांनी दुकाने पटापट बंद केली़ दरम्यान, नवीपेठेत किरकोळ दगडफेक झाली आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला़ शिंदे चौक आणि शिवाजी चौकात पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत गोंधळ घालणार्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावले़ महापुरुषांचे बदनामीकारक छायाचित्र सोशल साईटवर पडताच शनिवारी सायंकाळी नवीपेठसह काही भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ रविवारी दुपारी १२ वाजता भाजपा-सेनेचे कार्यकर्ते शिवाजी चौकात एकत्रित आले़ येथून ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत मोटरसायकलवरुन कार्यकर्त्यांचा जथ्था जुना पुणे नाक्याच्या दिशेने गेला़ कार्यकर्ते शिवाजी चौकातून शिंदे चौकाकडे निघाले़ शिवस्मारकाच्या आवारात कार्यकर्ते जमले आणि या ठिकाणी निषेध सभा घेतली़ या सभेला खासदार शरद बनसोडे, आमदार विजयकुमार देशमुख, सहसंपर्कप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी संबोधित केले़ यावेळी सेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, मनोज गादेकर, नगरसेवक प्रवीण डोंगरे, लहू गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे श्रीकांत घाडगे, प्रसाद लोंढे, राज सलगर, सुहास कदम, पिंटू महाले, शंतनू साळुंखे यांच्यासह जवळपास ५० कार्यकर्त्यांनी या निषेधात सहभाग नोंदवला़ यावेळी पोलीस उपायुक्त सुहास बुरसे या ठिकाणी आले आणि कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन देऊन या प्रकरणात दोषी असणार्या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली़
-------------------
वाहनांची तोडफोड़़
अन् सौम्य लाठीमार शिवाजी चौक आणि शिंदे चौकात गोंधळ घालणार्यांना हुसकावून लावत असताना किरकोळ दगडफेकीचा प्रकार घडला़ संतप्त कार्यकर्त्यांनी शिवस्मारक परिसरात रिक्षा(क्ऱएम़एच़१३/ ए़एफ़३८५६)ची काच आणि एका कारची काच फोडून पळ काढला़ पोलिसांना सौम्य लाठीमार करुन जमाव पांगवणे भाग पडले़
-------------------------
नेते, कार्यकर्त्यांना अटक व सुटका
निषेध सभा आटोपून शिवस्मारक बाहेर येताच पोलिसांनी खा़ शरद बनसोडे, आ़ विजयकुमार देशमुख, सेनेचे पुरुषोत्तम बरडे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले़ एका वाहनातून या सर्वांना पोलीस मुख्यालयात आणण्यात आले़ प्रतिबंधात्मक कारवाई करुन दुपारी दीड वाजता त्यांना सोडून देण्यात आले़
-----------------------
पोलिसांचा बंदोबस्त वाढविला
या घटनेनंतर शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला़ होमगार्ड, एसआरपी फोर्स, ट्रॅकिंग फोर्स, बॉम्बशोधक पथक अशी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली़ शिवाजी चौक, नवी पेठ, दत्त चौक, पाणीवेस, पार्क चौक, रंगभवन, सात रस्ता आदी भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला़ सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, उपायुक्त अश्विनी सानप, उपायुक्त दिलीप चौगुले, उपायुक्त सुहास बुरसे आदी वरिष्ठ अधिकार्यांनी शहरांमध्ये चौकाचौकात थांबून पोलीस कर्मचार्यांकडून आढावा घेतला़
-----------------------------------
आक्षेपार्ह मजकुराची माहिती मागितली
दरम्यान या प्रकरणात ३१ मे रोजी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ फेसबुक, व्हॉट्स अॅपवरुन अज्ञात अकौंटधारकाने आक्षेपार्ह छायाचित्रे टाकू न जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद सुनील कामाठी (न्यू पाच्छापेठ, खड्डा तालीम) यांनी फिर्याद दिली आहे़ तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सायबर क्राईम विभाग कामाला लागले आहे़ आज गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी राष्ट्रपुरुषांची अवमानकारक छायाचित्रे कुठून अपलोड झाली आहेत, याबाबतची माहिती येथील न्यायालयाकडे अर्ज करुन मागितली आहे़
------------------
पुणे, सातारा, पंढरपूरच्या बस थांबविल्या
शहराबाहेर नाक्यावर स्थानकाकडे येणार्या बसवर दगडफेकीचे प्रकार होत असल्याचा कानोसा घेत काही चालकांनी एस़टीग़ाड्या बाहेरच थांबविल्या़ स्थानकाशी संपर्क साधून पोलीस बंदोबस्तात गाड्या शहरात आल्या़ दुपारी १२ पर्यंत गाड्या सुरळीत होत्या, मात्र १२़३० ते दुपारी २़२० वेळेत नाक्याबाहेर दगडफे कीच्या घटना घडल्या़ वाहतूक नियंत्रकांनी परिस्थितीचा अंदाज घेत पुणे, सातारा, पंढरपूर, मोहोळ मार्गावरच्या गाड्या सोडल्या़ मात्र याही परिस्थितीत नाक्यावर जाणार्या ६ बसच्या काचा फोडल्या़ -------------------------
राष्ट्रपुरुषांच्या अवमानकारक मजकुरावरुन शहरात बंदोबस्त वाढवला आहे़ अफवा मोठ्या प्रमाणात पसरविल्या जात आहेत़ त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये़ आक्षेपार्ह मजकूर आढळून येत असेल तर तो उडवून टाका, समाजकंटकांकडून त्रास वाढला तर पोलिसांशी संपर्क साधा़ - प्रदीप रासकर पोलीस आयुक्त