उडगी: अक्कलकाेट तालुक्यात उडगी येथील हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या ग्रामदैवत पीर जिंदावली बाबा यांचा उरूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक येथील हजारो सर्वधर्मीय भाविक दर्शनासाठी उडगीत येतात. मागील वर्षापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने उपाययोजना म्हणून यात्रा, उत्सवावर निर्बंध आणले आहेत. शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणचा पीर जिंदावली बाबा यांचा उरूस रद्द करण्यात आला आहे. हा उरुस २९ मार्च ते ३१ मार्चदरम्यान होणार होता. यानिमित्ताने आयोजित केलेले सारे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष धोंडप्पा येळमेली आवाहन केले आहे. यावेळी यासीन मुजावर, राम पाटील, पंडित म्हेत्रे, शिवानंद येळमेली, मालबा कुसेकर, तुळजप्पा माड्याळ, धोंडूराज बनसोडे, सिद्रय्या सोड्डे, बसवराज कोळी उपस्थित होते.
----
२३ उडगी