शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आषाढी वारी विशेष; चेन्नईतील युवकांना पांडुरंगाचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 1:06 PM

सात वर्षांपासून पंढरपुराची आषाढी वारी; स्वीकार, तडजोड अन् शिस्त शिकवते वारी

ठळक मुद्दे वारी अन् वारीचं माहात्म्य आता सातासमुद्रापार पोहचलंयदेश-विदेशातील लोकांनाही वारीनं भुरळ पाडली आहेयंदाच्या वारीत चेन्नईच्या सहा तरुणाईची टीम संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात

शहाजी फुरडे-पाटील

पिराची कुरोेली : वारी अन् वारीचं माहात्म्य आता सातासमुद्रापार पोहचलंय. देश-विदेशातील लोकांनाही वारीनं भुरळ पाडली आहे. यंदाच्या वारीत चेन्नईच्या सहा तरुणाईची टीम संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात भेटली. यामध्ये तीन उच्चशिक्षित तरुणींचा समावेश आहे. या वारीमुळे जसे आहे तसे कसे राहावे व स्वीकारावे हे शिकविले, नियम कसे पाळावेत याचा तर वारी म्हणजे मापदंडच आहे. अ‍ॅक्सेप्टन्स.. कॉम्प्रमाईज आणि डिसीप्लीन हे तीन मंत्र वारीने दिल्याचं या युवकांनी लोकमतशी बोलताना आवर्जून सांगितलं. तामिळनाडू येथील तुकाराम गणपती हे भागवत धर्माची पताका तिकडे फडकवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे युवक वारीत आले आहेत. सदानंद मोरे यांच्यासोबत गणपती मूर्ती यांनी गाथा अध्ययन केले. त्यात ते एवढे एकरुप व तुकाराममय झाले की, तामिळनाडूमध्ये त्यांचे नाव तुकाराम गणपती असेच पडले. 

भक्ती, सेवा आणि निष्ठा याचा प्रचार करण्याचे काम ते करत आहेत. महाराष्ट्रातील संत घराणी देहूकर मोरे, पंढरीचे नामदास, पैठणचे गोसावी, बाबा महाराज सातारकर यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देहूकर पुंडलिक मोरे महाराज यांच्याकडेही ते अधूनमधून मार्गदर्शन घेत असतात.--------मराठी भजने आत्मसातहे पाच युवक बाबा महाराज सातारकर यांच्या दिंडीत गेल्या सात वर्षांपासून सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे ते मराठी भजने गातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवन कसे जगावे हेच वारी शिकवते. आम्ही वारीत चालत असताना साक्षात महाराज आमच्याबरोबर चालतात असा अनुभव येत असल्याचे अनुप्रिया आवर्जून सांगते. संत ज्ञानेश्वर महाराज हे विश्वमाऊली तर तुकाराम महाराज हे विश्वपिता आहेत असे हे म्हणतात.--------आजन्म वारी करणार!- हरीप्रिया, रूमला, गुरुराज, रोहित, अपर्णा आणि संजीवी अशी या तरुणाईची नावे आहेत. सीए, इंजिनिअरिंग, एमक़ॉम, बी़ए़ पदवीधर आणि वेद पंडित असे हे सर्व उच्चशिक्षित आहेत. आम्ही आजन्म वारी करणार हे सांगायला ते विसरले नाहीत. माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद बोलवले मग आम्ही तर कोणत्या का प्रांतातील असेना माणसे आहोत, असे गुरुराज म्हणाला. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरChennaiचेन्नई