शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

सोलापूरकरांनो; सहा कोटींचा दंड भरता की थेट कोर्टाची पायरी चढता ?

By appasaheb.patil | Published: August 05, 2022 12:37 PM

वाहतूक नियमांचे पालन होईना; वाहनधारकांचा बेशिस्तपणा वाढला

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : राज्यात शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम लागू केला. यात वाहतूक नियमांना अधिक महत्त्व दिले. वाहतूक नियमांचा भंग करू नये, म्हणूनच जबर दंड आणि वाहन परवाना निलंबन व खटला दाखल करण्याची तरतुदी केल्या आहेत. मात्र, तरीही वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दंड भरता की, खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करून कोर्टात खेचू, असा इशारा जिल्हा वाहतूक शाखेने दिला आहे.

आता नागरिकांनाच नियम पाळण्याची सवय करून घेण्याचीच गरज आहे. वाहतूक चलन (दंड) बऱ्याच प्रमाणात वाढविला आहे. हा दंड सामान्य नागरिकांना भरणे अशक्य आहे. परंतु, नियम पाळणे शक्य आहे. जबर दंडामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद वाढत आहे. मात्र, हा दंड सरकारच्या धोरणामुळे वाढलेला आहे. दंड पोलिसांनी वाढविला नाही हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.

------------

असा आहे दंड

वाहतूक नियम - वाहनधारक - एकूण दंड (लाखांत)

  • - विना हेल्मेट - ९६४३ - ४८, २१,५००
  • - विना सिटबेल्ट - १९, ५२७ - ३९,१५,०००
  • - वेगमर्यादेचे उल्लघंन - ६७६५ - १,३४,७१,५००
  • - वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - १५४४ - १७,३३,५००
  • - ट्रिपलशीट - ४०४० - ४०,४०,०००
  • - अतिरिक्त प्रवासी वाहतूक संख्या - ४८३७ - १०,७८,६००
  • - इतर - ४३,७०९ - २,७४, ७,८००

-----------------

ऑनलाइन नोटिसा

जे वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात त्यांना ऑनलाइन दंड केला जातो. त्या दंडाबाबत मोबाईलवर संदेशाद्वारे किती रुपयांचा दंड केला त्याबाबत कळविले जाते. त्यानंतर दंड भरण्यासाठी मोबाईलवर किंवा समक्ष पोस्टाद्वारे नोटीस पाठविली जाते. त्यात वाहतूक नियम मोडलेली तारीख, वेळ, स्थळ व एकूण दंडाचा समावेश असतो.

--------

दंड भरा...कारवाई टाळा...

ज्या वाहनधारकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाचा मॅसेज किंवा नोटीस प्राप्त झाली आहे. त्या वाहनधारकांनी त्वरित वाहतूक शाखा, वाहतूक कर्मचारी किंवा ऑनलाइन स्वरूपात भरून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

----------

वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वेळोवेळी दंड आकारण्यात येतो. त्याबाबतचा संदेश व दंड न भरल्यास नोटीसही मोबाईलवर पाठविला जातो. वाहनधारकांनी प्रलंबित दंड भरून वाहतूक नियमांचे पालन करावे.

- मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, सोलापूर.

-------------

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकRto officeआरटीओ ऑफीसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस