तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींमध्ये ७७.४५ टक्के मतदानाची नोंद झाली. चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर महाळूंग ग्रामपंचायतीने मतदानावर बहिष्कार टाकला होता. तालुक्यात गणेशगाव सर्वाधिक १०८० पैकी ९९७ म्हणजे ९२.३१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर आशिया खंडात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीत २८ हजार ५४५ पैकी १६ हजार ७५९ म्हणजेच ५८.५१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाचा आलेख
बोंडले, खळवे, विठ्ठलवाडी, गणेशगाव, बिजवडी, बांगर्डे आदी ग्रामपंचायतींचा मतदानात वरचश्मा दिसला. तर अकलूज, संग्रामनगर, नातेपुते ,दसूर, बोरगाव या ग्रामपंचायतीत कमी मतदान झाले. शेंडेचिंच, पिंपरी, गारवाड, मगरवाडी, विठ्ठलवाडी, बिजवडी, कोथळे, माळखांबी, तांबवे आदी गावांमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. मतदानात वाढलेला अथवा कमी झालेला मतदानाचा टक्का नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार, याचे चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे.