घोळसगावं येथील दिलीप सि. पाटील, गुंडेराव पाटील, व्यंकटराव पाटील, भालचंद्र पाटील, पुतळाबाई पाटील, महादेवी गोविंद राजमाने (रा.अणदूर ता. तुळजापूर), तत्कालीन तलाठी विकास उत्तम घंटे, मंडळ अधिकारी मनोज निंबाळकर (रा.अक्कलकोट) यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
फिर्यादी प्रकाश विनायक पाटील हे जिवंत असताना वरील लोकांनी १५ जानेवारी१९८४ मध्ये मृत झाल्याचे दाखवून १८ जुलै २०१९ रोजी १ हेक्टर ६७ आर. क्षेत्रावर फेरफार नोंद केली. त्यानंतर फिर्यादी ६ ऑगस्ट १९ रोजी तक्रार देण्यासाठी उत्तर पोलीस ठाण्यात गेले असता, दखल घेतली नाही. त्यानंतर फिर्यादिनी वकील यू. एस. पायमल्ली यांच्या मार्फत अक्कलकोट येथील दिवाणी न्यायाधीश शरद गवळी यांच्यासमोर तक्रार दाखल केली. वकिलांनी ठोस पुरावे दाखल करून युक्तिवाद केला. सरकारी कर्मचाऱ्यांनी कर्तव्य न बजावता आरोपींना मदत होईल या दृष्टीने काम केले, हे पुराव्यानिशी सिद्ध केले. कोर्टाने उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना आरोपीविरुद्ध दाखलपात्र गुन्हा दाखल करून घेऊन १५६(३) सीआरपीसी प्रमाणे तपास करण्याचे आदेश दिला आहे. फिर्यादीकडून वकील यू. एस. पायमल्ली, ए. जे. घिवारे यांनी काम पाहिले.
कोट ::::::::
अक्कलकोट येथील न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत पोलीस ठाण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित बिट अंमलदार यांच्याकडे चौकशीसाठी दिलेले आहे. लवकरच गुन्हा दाखल होईल.
- के. एस. पुजारी,
पोलीस निरीक्षक