प्रकाशाने काढलेल्या चित्रकलेला छायाचित्र असे म्हणतात. छायाचित्रकाराकडे त्याच्या आयुष्यातील अनेक क्षण कायमस्वरूपी टिपण्याची किमया आहे. उत्तम छायाचित्र काढण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यामध्ये प्रामुख्याने उत्तम कॅमेरा आणि लेन्स, कॅमेरामागील डोळा (नजर), छायाचित्रकाराचा विचार, टिपायचा योग्य क्षण, उत्तम प्रकाश आणि कॅमेरा सेट करण्यासाठी लागणारे उपकरण यांचा समावेश होतो.
छायाचित्राचा दर्जा हा आपण वापर करीत असलेल्या कॅमेºयाच्या दर्जेवर अवलंबून असतो याकरिता कॅमेºयाचे सर्व भाग आणि कॅमेरा सेटीन्ग्स यांचा सखोल अभ्यास, कॅमेºयासोबत असलेले माहितीपत्रक याचा सखोल अभ्यास, कॅमेºयाचे परिस्थितीनुसार जलद सेटिंग, कॅमेºयाचा सराव, जागेवरच फुल्ल फ्रेम ईमेज घेणे, कमी प्रकाशात छायाचित्र काढण्याचा सराव, छायाचित्राचे उत्तम संपादन (एडिटिंग) करणे, उत्तम प्रिंट घेणे हे आवश्यक आहे.
मागील २२ वर्षे मी पक्षी निरीक्षण करीत आलो आहे. पक्षी निरीक्षण करीत असताना पाहिलेल्या मी माझ्याकडे असलेल्या दुर्बिणीला सोनी सायबेरशॉट या छोटा कॅमेरा लावून छायाचित्रे काढीत असे. ही छायचित्रे पक्ष्यांचे रेकॉर्डसाठी आणि अभ्यासासाठी काढायचो. फार उत्तम दर्जाची नसायची.
माझा जेव्हा पक्ष्यांचा पुरेसा अभ्यास झाल्यानंतर मी उत्तम कॅमेरा विकत घेतला. मागील ७ वर्षांपासून गंभीरपणे छायाचित्रे काढीत आहे. माझ्याकडे सध्या जगातील उत्तम कॅमेरा सेट ; कॅनॉन १ डीएक्स, कॅनॉन ५ डी मार्क ४, कॅनॉन ७ डी मार्क २ हे तीन बॉडीज आणि ६०० एमएम प्राइम, ४०० एमएम प्राइम आणि २४/१०५ एमएम हे तीन लेन्स आहेत. त्याचबरोबर लागणारे इतर साहित्यही आहे. या कॅमेºयासाठी मला खूप पैसे द्यावे लागले.
छायाचित्रीकरण करताना मी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे संयम. मला काही उत्तम छायाचित्रे ३ मिनिटात मिळाली तर काही मिळवण्यासाठी २० वर्षे लागली. तुम्ही छायाचित्र काढताना जेवढा संयम पाळाल तेवढे तुमचे छायाचित्र उत्तम येतील. यासाठी छायाचित्रीकरणाचे काही शिष्टाचार पाळणे महत्त्वाचे आहेत. उदा. प्रकाशाची दिशा, छायाचित्रीकरणाचा वेळ, पार्श्वभूमीचे योग्य अंतर, छायाचित्रातील ठळक वस्तू, कॅमेरा आणि प्रमुख वस्तू यातील योग्य अंतर, स्थळावर क्षणात निर्णय घेण्याची क्षमता, कॅमेºयाचे सेटीन्ग्स, जंगलात छायाचित्रे काढताना जंगलात वावरतानाचे शिष्टाचार, वन्यजीवाला इजा न पोहोचवणे, स्वत:ची काळजी घेणे, अति जोशात न वागणे.
छायाचित्र टिपणे ते छायाचित्राची प्रिंट घेणे हा मोठा प्रवास असतो. जेव्हा तुमच्याकडे चांगल्या छायाचित्रांचा संग्रह होतो तेव्हा त्याचे प्रदर्शन भरविणे, नवोदित आणि तरुणाला तुमचा अनुभव सांगणे, त्याचे प्रसिद्धीकरण करणे. स्पर्धेसाठी छायाचित्रे पाठविणे हे करण्यास विसरू नये.
निसर्गाची आणि वन्यजीवाची छायाचित्रे काढल्यास न कळत तुमचे निसर्गाशी नाती जुळतात, निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे याची प्रचिती होते, निसर्गाशी नाती जोडल्यास आपले आयुष्य आनंदी आणि शांततामय राहते, प्रत्येकांमध्ये एक छायाचित्रकार दडलेला असतो त्याला योग्य मार्ग द्यावा, मागील ४ ते ५ वर्षांमध्ये सोलापुरातील अनेक युवक निसर्ग आणि वन्यजीव छायाचित्र टिपत आहेत. माझा अनुभव मी सर्वांबरोबर सामाईकरण करीत असतो. आपण सोलापूरकर फारच नशीबवान आहोत कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये छायाचित्रे काढण्यासाठी उत्तम अभयारणे, वन्यजीवन, पक्षी, प्राणी, नद्या, धरणे, प्राचीन मंदिर वगैरे अशी अनेक ठिकाणे आहेत.उत्तम छायाचित्रकार होण्यासाठी कॅमेºयाचा सराव, मेहनत, वेळ आणि आवड या गोष्टींना पर्याय नाही.- डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ अन् छायाचित्रकार आहेत.)