जेष्ठ नागरिकांची नोंदणी करुन वार्डाप्रमाणे लसीकरणाचे नियोजन करून पात्र नागरिकांची नोंदणी वय, प्रभाग, कोमार्बिड, प्रथम, द्वितीय डोसनुसार करुन घ्यावी. जसजशा लसी उपलब्ध होतील त्याप्रमाणे नागरिकांच्या तयार यादीनुसार सुरक्षित अंतर ठेऊन नियोजनबद्ध लसीकरण करणे सोपे होईल.
पंढरपुरामधील जवळपास ३७०० नागरिकांच्या दुसऱ्या डोस संदर्भात यादी तयार करुन नियोजन केले आहे. डॉक्टर व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सदर व्यक्तींना नियोजित कालावधी संपल्यानंतर लसीकरण करावे. लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस नेमका कुठे मिळणार याची निश्चित माहिती मिळाली नाही. अशा नागरिकांची यादी बनवून पंढरपूरमध्ये स्वतंत्र लसीकरण करावे. ज्या गावात लसीचा पहिला डोस घेतला आहे त्याच गावात दुसरा डोस नियोजन पद्धतीने मिळावा. काही नागरिकांनी परजिल्ह्यात लसीचा पहिला डोस घेतला पण आता जिल्हाबंदी असल्याने ते आपल्या घरी पंढरपुरात आहेत. त्यांच्यासाठीही लसीकरणाचे नियोजन आखण्यात यावे, अशी मागणी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्याकडे नगरसेवक विवेक परदेशी यांनी केली आहे.