शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा
2
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
3
Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड
5
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक
6
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
7
'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजेश लाटकरांसाठी मधुरिमाराजे अन् मालोजीराजे मैदानात; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
9
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
10
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
11
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
12
“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे
13
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
14
“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका
15
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
16
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
17
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काँग्रेसला सरकार येणार नसल्याची खात्री'; जाहीरनामावर मुनगंटीवार यांची टीका
20
यूक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राजधानी मॉस्कोवर डागले 34 ड्रोन

बाटलीने पाणी घालून माढ्यातील विद्यार्थी जगवितात झाडे; पक्ष्यांसाठी सुरू केली पाणपोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:34 PM

माढा : माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पर्यावरणाची जाण जोपासत आहेत. रिकाम्या बिसलरी पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्या ...

ठळक मुद्देपर्यावरणाची जाण, माढा झेडपीच्या प्राथमिक शाळेचा उपक्रमकाही विद्यार्थ्यांनी झाडाला पाणी भरलेले मडके बांधून पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू केली

माढा : माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पर्यावरणाची जाण जोपासत आहेत. रिकाम्या बिसलरी पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्या माध्यमातून शाळेच्या परिसरात असलेल्या झाडांना जगविण्याचे काम हे प्राथमिक शाळेचे विद्यार्थी करीत आहेत़ पर्यावरणाचे धडे केवळ पुस्तकातूनच न गिरविता प्रत्यक्षात पर्यावरणासाठी झटणाºया या बालकांचे कौतुक होत आहे.

या जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत पहिली ते सहावीपर्यंत अडीचशे विद्यार्थी शिकतात. या मुलांना मूल्य शिक्षणाचे धडे शाळेत रोजच दिले जातात. काही दिवसांपूर्वी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धैर्यशील भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. आपण लावलेल्या वृक्षांची आणि सभोवताली दिसणाºया वृक्षांची काळजी घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आली.

व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापिका मालती तळेकर यांच्यासह शिक्षकांनी झाडांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यातूनच या विद्यार्थ्यांना झाडांचा लळा लागला आहे. शाळेच्या सुट्टीत खेळण्याबागडण्यासोबतच ही मुले आनंदाने या झाडांची काळजी घेत असल्याचे चित्र दिसत आहे. रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्या माध्यमातून झाडांच्या मुळाशी हे विद्यार्थी पाणी देत असतात. झाडाला आळी करून बाटलीने पाणी देण्याचे काम हे विद्यार्थी करतात. शाळा चालू असेपर्यंतच नव्हे तर उन्हाळ्यातही झाडांना पाणी देण्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी केला आहे.

पक्ष्यांसाठी पाणपोईसुद्धा- काही विद्यार्थ्यांनी झाडाला पाणी भरलेले मडके बांधून पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे. झेडपीची शाळा असतानादेखील येथे लोकवर्गणीतून लाखो रुपयांची कामे झाली आहेत. अद्ययावत संगणक कक्ष, जल शुद्धीकरण यासारख्या सोयी खासगी शाळेप्रमाणे येथे मिळत असल्याने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणSchoolशाळाEducationशिक्षणdroughtदुष्काळ