राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाची सांगोला नगरपरिषद मार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. सांगोला शहर पर्यावरणपूरक शहर बनविण्यासाठी सांगोला वृक्ष बँक या संकल्पनेची सुरुवात केली. यात झाडांची रोपे व ट्री गार्ड स्विकारले जात आहेत.
यावेळी नगराध्यक्षा राणी माने, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रूपनर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी आ. पाटील नगरपरिषदेच्या वृक्ष बँकेस ५०० ट्री गार्ड देण्याची घोषणा केली.
नगर परिषदेचा अनुकरणीय उपक्रम
वृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक शिवजयंती साजरी करण्याचा सांगोला नगर परिषदेचा हा उपक्रम स्तुत्य, दिशा दर्शक व अनुकरणीय आहे. माझी वसुंधरा अभियानात नगरपालिकेचे उत्तम काम सुरू आहे. सांगोला वृक्ष बँक हा उपक्रम राज्यातील पहिला प्रयोग असून इतर नगरपालिकाही याचे अनुकरण करत असल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
फोटो ओळ ::::::::::::::::::
सांगोला येथे वृक्षारोपण करताना आ. शहाजीबापू पाटील, नगराध्यक्षा राणी माने, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, आनंद माने, भाऊसाहेब रूपनर, शोभा घोंगडे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे आदी.