एकीकडे रुग्णालयातील बेड, रेमिडेसिविर इंजेक्शन याची कमतरता जाणवते तर दुसरीकडे रक्त पिशवीबरोबरच प्लाझ्माचीही तीच परिस्थिती होऊ लागल्याने कोरोनाच्या कठीण परिस्थितीत मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक डॉक्टर प्लाझ्माचे आवाहन करू लागल्याने बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते राहुल उपरे यांनी या कठीणप्रसंगी आपली पॉझिटिव्ह दृष्टी दाखवून १५ दिवसांत दोन वेळा प्लाझ्मा दान करून दोघांचे प्राण वाचविण्याचे काम केले.
बार्शी येथील भगवंत रक्तपेढीचे चेअरमन शशिकांत जगदाळे यांनी कोरोना रुग्णांना मोफत प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करताच त्यास प्रतिसाद म्हणून राहुल उपरे यांनी दोनवेळा मोफत प्लाझ्मा दान केले आहे.
यावेळी भगवंत रक्तपेढीचे अध्यक्ष शशिकांत जगदाळे यांनी मोफत प्लाझ्मा देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्वस्तरातून आणि विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून कौतुक होत आहे.यावेळी भगवंत रक्तपेढीचे अध्यक्ष शशिकांत जगदाळे यांनी मोफत प्लाझ्मा देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्वस्तरातून आणि विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून कौतुक होत आहे.
----
सामाजिक बांधिलकी
यातील प्लाझ्मादाते उपरे यांचे वडिलांचे गेल्या महिन्यातच कोरोनामुळे निधन झाले आहे. अशाप्रकारे कोणावर असे संकट ओढावू नये या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गणेश मूर्तिकार उपरे यांनी इतरांचा जीव वाचविण्यासाठी पुढे येऊन दान केले.
----
०८बार्शी-प्लाझ्मादान
कोरोनावर रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी राहुल उपरे प्लाझ्मादान करताना तर बाजूला रक्तपेढीचे गणेश जगदाळे दिसत आहेत.