सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, सोमवारी सकाळी सहा वाजता दौंडमधून ९ हजार ७०४ क्युसेक्सने विसर्गात वाढ झाली. बंडगार्डन येथून १ हजार ३१६ तर दौंडमधून येणारा विसर्ग १४ हजार ११५ क्युसेक्स होता. सायंकाळपर्यंत त्यात वाढ करून सध्या बंडगार्डन येथून ३६ हजार १७८ तर दौंडमधून १९ हजार ५८५ असा विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणाची वाटचाल प्लसकडे सुरू आहे.
सोमवारी दुपारी १२ वा. धरण वजा ४.६१ होते. २१ जूनला धरणाची टक्केवारी १९ होती. एकूण पाणीसाठा ६१.१९ टक्के तर उपयुक्त पाणीसाठा २.४७ टक्के आहे. आषाढी वारीसाठी भीमा नदीत सोडलेल्या तीन हजार क्युसेक्सवरून ४ हजार ७०० क्युसेक्स पाणी नदीला सोडले आहे. अशात सोमवारी उजनी धरणाच्या वरच्या बाजूला पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उजनीत येणाºया विसर्गात मोठी वाढ होत आहे.
सोमवारी दुपारी ३.०० वाजता पुणे जिल्ह्यातील वडूज धरणातून २ हजार ४००, कळमोडी धरणातून ४ हजार ७००, वडिवळेतून ३ हजार ९०० तर खडकवासला धरणातून १० हजार एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे दुपारी २१ हजार क्युसेक्सने पाणी उजनीत येत होते. सायंकाळी ६ वाजता बंडगार्डन येथून येणाºया पाण्यात विक्रमी वाढ झाली. ३६ हजार १७८ क्युसेक्स तर दौंड येथून होणारा विसर्ग १९ हजार ५८५ क्युसेक्स एवढा वाढला आहे. प्रशासनाने धरणकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. परंतु हे पाणी मंगळवारी पोहोचेल. अजूनही विसर्ग वाढण्याची शक्यता धरण प्रशासनाने दिली आहे. उजनी धरणात असाच विसर्ग राहिला तर धरण मंगळवारपर्यंत प्लसमध्ये येणार आहे.
उजनीची सद्यस्थिती
- - एकूण पाणीपातळी ४९०.७०० द. ल. घ. मी.
- - एकूण पाणीसाठा १७६८.६२ द. ल. घ. मी.
- - उपयुक्त पाणीसाठा - ६४.१९
- - टक्केवारी वजा ४.२३
- - बंडगार्डनमधून विसर्ग ३६ हजार १७८ क्युसेक्स
- - दौंडमधून विसर्ग १९ हजार ५८५
- - भीमा नदीला सोडलेले पाणी ४ हजार ७०० क्युसेक्स.
- पुणे जिल्ह्यातील १९ धरणांची स्थिती व पाऊस
- पिंपळजोगे ०.०० टक्के, पाऊस (५० मि. मी.), माणिकडोह २३.१० टक्के (५८ मि. मी.), वडूज ४९.९० टक्के (४० मि. मी.), डिंबे ४४.३० टक्के (५० मि. मी.), घोड ०.०० टक्के (निरंक), विसापूर ११.४८ टक्के (निरंक), कळमोडी १०० टक्के (६५ मि. मी.), चासकमान ५२.३३ टक्के (४० मि. मी.), भामाआसखेड ५४.०० टक्के (२६ मि. मी.), वडिवळे ७७.०० टक्के (१०० मि. मी.), आद्रा ७८ टक्के (५० मि. मी.), पवना ६३ टक्के (१५० मि. मी.), कासारसाई ८१.१० टक्के (३० मि. मी.), मुळशी ६१.२० टक्के (११० मि. मी.), टेमघर ४५.६० टक्के (१०५ मि. मी.), वरसगाव ४५ टक्के (८० मि. मी.), पानशेत ७३.८५ टक्के (८५ मि. मी.), खडकवासला ९९ टक्के (२५ मि.मी.) इतकी टक्केवारी आहे.