यावेळी प्लॉटधारक राजाभाऊ सुरवसे, सचिन मोरे, अविनाश शिंदे, इमाम मुलाणी, सोमनाथ शिंदे, रमेश दराडे, बप्पा घाणेगावकर, शिवाजी खरवणे, नितीन वाघमारे, बारबोले मेजर, लोखंडे, मेजर पोकळे, सूरज शिंदे, अभिजित पाठक, जीवन लुगडे, महेश बाभळे, लालासाहेब शेवाळे, काळे उपस्थित होते.
असे आहे अभियानाचे स्वरुप
यावेळी नागेश अक्कलकोटे यांनी शहराचा दिवसेंदिवस वाढता विस्तार, झालेले-होणारे लेआऊट, गुंठेवारी या पार्श्वभूमीवर प्लॉटधारकाच्या हक्काचे असणारे ओपनस्पेस विक्री होणे, गायब होणे अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढत होत्या. याबाबत प्लॉटधारक नागरिकांत जागृती करून ओपन स्पेसबाबत असणारी कायदेशीर बाजू सांगणे. प्लॉटधारकांची सोसायटी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन मदत करणे आणि सोसायटी स्थापन झाल्यावर नगरपालिकेकडे हस्तांतरित केलेले ओपन स्पेस सोसायटीच्या नावे हस्तांतरित करून देणे त्याबाबत माहिती देणे, प्लॉटधारकांसमवेत पाठपुरावा करणे असे या अभियानाचे स्वरूप असल्याचे स्पष्ट केले.
----
----
020921\06491749-img-20210902-wa0011.jpg
ओपन स्पेस जनजागृती अभियान ला प्लॉट धारकांचा प्रतिसाद