- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. आत्तापर्यंत १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता १४ वा हप्ता गुरूवार २६ जुलै २०२३ रोजी जमा होणार आहे. त्यासंदर्भातील मॅसेज संबंधित शेतकरयांच्या मोबाईल मिळाला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी.एम. किसान योजनेचा १४ वा हप्ता २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता राजस्थानमधील सिकर येथून वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी आपणास आमंत्रित करण्यात येत आहे. तरी आपण या कार्यक्रमास ऑनलाइन किंवा समक्ष उपस्थित रहावे असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केल्याचा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईल प्राप्त झाला आहे. याआधी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात १३ वा हप्ता जमा झाला होता. ई-केवायसी अद्याप झालेले नाही अशा शेतकऱ्यांना १४ हप्ता मिळणार नाही. यासोबतच जर एखाद्याच्या आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल तर त्याचा १४ वा हप्ताही थांबवला जाऊ शकतो असेही एका कृषी अधिकारी यांनी सांगितले.