मिशेल मामाचं चोरांसोबतचं कनेक्शन शोधावं लागेल; 'राफेल'वरून मोदींचं विरोधकांवर शरसंधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 01:36 PM2019-01-09T13:36:58+5:302019-01-09T13:52:19+5:30
'केवळ हेलिकॉप्टरच नव्हे तर लढाऊ विमानांच्या घोटाळ्यातही हात असलेल्यांचे मिशेल मामा कनेक्शन आता शोधावेच लागणार आहे. त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येत असल्यामुळेच घाम फुटलेले आता चौकीदाराला चोर म्हणून हिणवत आहे,' या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राफेल आरोप'प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.
सोलापूर : 'केवळ हेलिकॉप्टरच नव्हे तर लढाऊ विमानांच्या घोटाळ्यातही हात असलेल्यांचे मिशेल मामा कनेक्शन आता शोधावेच लागणार आहे. त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येत असल्यामुळेच घाम फुटलेले आता चौकीदाराला चोर म्हणून हिणवत आहे,' या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राफेल आरोप'प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.
सोलापुरात वेगवेगळ्या सहा विकासकामांचे भूमिपूजन अन् लोकार्पण करण्यासाठी ते आले होते, तेव्हा भाषणात त्यांनी एकीकडे गेल्या साडे चार वर्षातील विकास कामांची यादीच वाचून दाखवली तर दुसरीकडे आघाडी सरकारच्या काळातील दहा वर्षांचा कारभारही लोकांसमोर मांडला.
2004 ते 2014 या काळात आघाडी सरकारने गरिबांना 13 लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र बांधली फक्त आठ लाख. याचा अर्थ वर्षाला 80 हजार. मात्र इथं सोलापूरात बघा.. केवळ एका शहरातच आम्ही तीस हजार घरे बांधून देत आहोत. एवढ्या जलद गतीने विकास होण्याचे कारण म्हणजे आम्ही कमिशन खात नाही. दलाली मागत नाही आणि लोकांनाही खाऊ देत नाही, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की मिशेल मामाचे या चोरांसोबत सोबत काय कनेक्शन होते हे आता शोधून काढावे लागेल.