वैराग : वैराग ( ता. बार्शी ) येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमिती वैरागच्या आडत बाजारात जुगार आड्यावर पोलीसांनी धाड टाकली. या धाडीत जुगार खेळणाºया दहा प्रसिद्ध जुगारी व्यापारांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. यामध्ये लाखों रूपयांची रोकड व इतर मुद्येमाल पोलीसांनी हस्तगत केला असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
ही धाडीची कारवाई रविवारी २० मे रोजी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास आडत बाजारात एका अडतीमध्ये घडली. यामध्ये दहा जणांवर मुंबई जुगारअॅक्ट व प्रतिबंधात्मक कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत वैराग पोलीसांत सुरू होती. या प्रकरणात वैराग ग्रामपंचायत माजी सदस्य, प्रसिद्ध आडते, व्यापारी, खरेदी -विक्रेते यांचा समावेश असून रात्री उशिरापर्यंत या दहा जणास वैराग पोलीस स्टेशनमध्ये सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
मात्र ताब्यात घेतलेल्या त्या दहा जणांची नावे सांगण्यास पोलीसांनी नकार देत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उपनिरीक्षक सचिन पत्रे यांनी पत्रकारांना सांगत कारवाईबाबत हात झटकले. या धाडीत केलेली कारवाई दिखात्मक करीत व्यापारी वर्गाना वेठीस धरण्याचा प्रकार पोलिसांनी केला. प्रसिद्ध आडते, व्यापारी वगार्ना अभय दिले. या जुगार अड्यावर झालेल्या कारवाईची सखोल चौकशी करावी अशी मागणी जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्याकडे करणार असल्याचे व्यापारी संघाचे सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.