आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : भाळवणी (ता़ पंढरपूर) येथील अवैध धंद्यावर ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने अचानकपणे धाड टाकून एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणात ५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़ याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना शुक्रवार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भाळवणी (ता पंढरपूर) येथील रेणुका हॉटेल, स्नेहा गार्डन, तृप्ती हाँटेल तसेच गावातील राजेशाही हॉटेलचे पाठीमागे, गोंधळी गल्ली, बोदे गल्ली, खाटीक गल्ली, माळी गल्ली, गोंधळी चौक या ठिकाणी विक्री करीत असलेल्या दारू आड्ड्यांवर छापा टाकून अवैधरित्या देशी दारू, विदेशी दारू, हातभट्टी, सिंदी जप्त केली़ याप्रकरणातील हनुमंत लिंगे, संदीप पिताबंर शिंदे, राजु शिवाजी भोसले, समर्थ सुनिल पाले, भिमराव नाना शेरकर, बबन भारत शिंदे, अशोक सतया भंडारी, कुमार भगवान इंगोले, जगदीश माणिक कांबळे, हरिभाऊ भिमराव लिंगे, देविदास लक्ष्मण शिंदे, पोपट किसन चव्हाण सर्व रा भाळवणी यांच्या ताब्यातून एकूण ७९,३३५ रूपये किंमतीची देशी, विदेशी दारू, हातभट्टी व सिंदी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील सपोनि संदीप धांडे, पोसई गणेश निंबाळकर, पोहेकॉ मनोहर माने, अंकुश मोरे, पो.ना अमृत खेडकर, पो.कॉ बाळराजे घाडगे, अनुप दळवी, सागर ढोरे पाटील, श्रीकांत बुरजे, श्रीकांत जवळगे, सुरेश लामजाने, अमोल जाधव, विलास पारधी, सिध्दाराम स्वामी, पांडूरंग केंद्रे, अक्षय दळवी, गणेश शिंदे, विष्णू बडे, महादेव लोंढे या टिमने काम केले आहे.
भाळवणी येथील अवैद्य दारू आड्यांवर पोलीसांची धाड, ५ आरोपींना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 4:50 PM
भाळवणी (ता़ पंढरपूर) येथील अवैध धंद्यावर ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने अचानकपणे धाड टाकून एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणात ५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़
ठळक मुद्देयाप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल एकूण ७९,३३५ रूपये किंमतीची देशी, विदेशी दारू, हातभट्टी व सिंदी जप्तअवैध धंद्यावर ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने अचानकपणे धाड