९ मे रोजी दु. ३ च्या सुमारास पोलीस नाईक धनंजय अवताडे, पोलीस नाईक नागेश निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे हे सांगोला पोलीस स्टेशनला असताना वाढेगाव येथील शहाजी माने याने पोलीस नाईक धनंजय अवताडे यांच्या मोबाईलवर फोन केला.
सांगोला ते मंगळवेढा जाणाऱ्या रोडवर वाढेगाव येथील मुख्य चौकात साध्या गणवेशातील एक व्यक्ती मी पोलीस आहे असे सांगून एमएच-१३ एक्यू ९१५२ ही त्याची दुचाकी रस्त्याच्या शेजारी लावली. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहन अडवून लायसन्स कागदपत्रांची मागणी करत असे. ते नसल्यास पावती फाडण्याची भीती दाखवून पैसे गोळा करत असल्याचे माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ वाढेगाव येथील मुख्य चौकात जाऊन त्यास रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिसांनी दोन पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १०० रुपयांच्या ४ नोटा मिळून आल्या. याबाबत पोलीस नाईक धनंजय अवताडे यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संतोष रावसाहेब काटकर (वय ३५, रा. भोसे, ता. मंगळवेढा) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.