कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. काही अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवसाय बंद केले आहेत. करकंबमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त झाल्याने ग्रामस्तर समितीने २७ एप्रिलपर्यंत आरोग्य सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
करकंबमध्ये आतापर्यंत ३७७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून ३२१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर दहा व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात ४६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात करकंब हे गाव कोरोनाचे केंद्रबिंदू ठरत आहे. करकंबनंतर भोसे येथेही कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या जास्त आहे.
कोविड टेस्ट करणे आवश्यक
कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नाकाबंदीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट करणे आवश्यक आहे. आम्ही उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रभा साखरे यांच्याशी चर्चा केली आहे. मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून पॉझिटिव्ह व्यक्तीला कोविड सेंटरला पाठवणार आहोत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन सपोनि. प्रशांत पाटील यांनी केले आहे.
फोटो ओळ :::::::::::::::::::
करकंब-टेंभुर्णी रोडवर जळोली चौकात नाकाबंदी करून नागरिकांची कसून चौकशी करताना विजय गोरवे व इतर पोलीस कर्मचारी.