याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजाराम मागाडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश कोळेकर (महूद), सचिन शशिकांत रायचुरे, विशाल दत्तात्रय अडसूळ, महेश देविदास जाधव, नवनाथ खटकाळे, मंगेश रायचुरे (रा. नाझरे, ता. सांगोला), गणेश मायाप्पा भानवसे (रा. बोहाळी ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ घुणे, सहायक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड, पोलीस नाईक लालसिंग राठोड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन मागाडे हे रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. बातमीदारामार्फत त्यांना नाझरे येथील सचिन रायचुरे हा त्याच्या शेतात अवैध वाळूसाठा बाळगून तो जेसीबीच्या साह्याने टिपर व ट्रॅक्टरमध्ये भरून देत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याआधारे पथकाने अचानक धाड टाकून ही कारवाई केली.
पोलिसांनी तेथून १० लाखांचा एमएच १३/ एएक्स ३८३८ या टिपरसह १८ हजारांची ३ ब्रास वाळू, १० लाख रुपयांचा एमएच १७ /बीएक्स ३५०७ जेसीबी, २ लाख रुपयांचा बिगर नंबरचा डम्पिंग ट्रॅक्टर, ६ हजार रुपयाची १ ब्रास वाळू असा सुमारे २२ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर करीत आहेत.