पंढरपूर : सोशल मेडियावरील जाहीरातीचा फायदा घेत व्यवसायिकांची लाखो रुपयांची लुट करणाºया टोळीला पोलीसांनी जेरबंद केले आहे. हि कारवाई मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटे पुळुज येथे करण्यात आली. यावेळी तलावर, कुऱ्हाडी, भाला व अन्य हत्यारे, ८ गाड्या व डिजेचे साहित्य जप्त केले आहे.
मागील दोन महिन्यात पुळूज येथील काही लोक सोशल मेडीयावरील व्यवसायीकांच्या जाहीरातीपाहून त्यांना फोनद्वारे संपर्क साधत होते. प्रत्येकांच्या व्यवसायानुसार आमच्याकडे तुमच्या व्यवसायांशी निगडीत वस्तु आहेत. सध्या व्यवसाय बंद आहे. यामूळे कमी किंमतीत विकत देतो म्हणून संंबंधीत व्यक्तींना बोलावून घेत. आलेल्या व्यवसायींकांना दहा ते १५ लोक तलवार, चाकु, भाला, कुऱ्हाडी व अन्य शस्त्राचा धाक दाखवून सोने, पैसे व मोबाईलची लुट करत होते. अशा घटना वारंवार घडत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ६० जणांचे एक पथक तयार केले.
मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटे पर्यंत पुळज येथील पारधी वस्तीवर करवाई केली. यामध्ये डिजेचे साहित्य आहे. यामध्ये अॅम्पलीपायर, सांऊड बॉक्स व अन्य डिजेचे साहित्य, वाहने, संशयीत पुरुष व महिला यांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे, पोनि. धनंजय जाधय, पोनि. किरण अवचर, पोउपनि. रियाज मुलाणी, सपोनि. धुमाळ, पोनि. सत्यजित अधटराव, सपोफौ हणुमंत देशमुख, पोकॉ. सुजित उबाळे, पोकॉ. सचिन इंगळे, अभिजीत कांबळे, गणेश कांबळे, महिला पोलीस कर्मचारी माधुरी भारमल, सविता थोरात, शितल राऊत, कुसुम क्षिरसागर, मनिषा पांचाळ, मनाबाई डांगे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.